Join us
Daily Top 2Weekly Top 5

विनोद खन्ना यांची प्रसिद्ध गाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 14:08 IST

विनोद खन्नाच्या कारकिर्दीची सुरुवात खलनायकाच्या भूमिकेने झाली होती. पण नंतर विनोद खन्ना हिरो म्हणून नावारूपास आलेत. १९७१ मध्ये ‘हम तुम और वो’ मध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली.

हॅण्डसम हिरो विनोद खन्ना यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी हळहळ व्यक्त करायला सुरूवात केली. एक चांगला अभिनेता आपण गमावला आहे अशी भावनाा प्रत्येकाच्याच मनात येत आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीतील एक कारकिर्द गाजवली आहे. विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’,‘कुबार्नी’,‘पूरब और पश्चिम’,‘रेशमा और शेरा’,‘हाथ की सफाई’,‘हेराफेरी’ अशा अनेक चित्रपटांत शानदार अभिनय केला.  विनोद खन्नाच्या कारकिर्दीची सुरुवात खलनायकाच्या भूमिकेने झाली होती. पण नंतर  विनोद खन्ना हिरो म्हणून नावारूपास आलेत. १९७१ मध्ये ‘हम तुम और वो’ मध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली. विनोद खन्ना यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होत. अलीकडे शाहरूख खान व काजोल स्टारर ‘दिलवाले’ या चित्रपटात ते दिसले होते.जुर्म कुर्बानीलहु के दो रंग  हाथ की सफाई चांदणी