Join us

श्री श्री रविशंकर यांच्या बायोपिकमध्ये दिसणार विक्रांत मेस्सी, 'या' देशात होणार सिनेमाचं शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 12:32 IST

भारताबाहेर का होणार सिनेमाचं शूट? समोर आलं कारण

'12th फेल' फेम अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) 'आँखो की गुस्ताखियां' सिनेमा येत आहे. यामध्ये तो स्टारकिड शनाया कपूरसोबत दिसत आहे. यानंतर तो आगामी सिनेमाची तयारी सुरु करणार आहे,. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर  (Shri Shri Ravishankar) यांच्या बायोपिकमध्ये तो भूमिका साकारणार आहे. रविशंकर यांच्यासोबतचा विक्रांतचा फोटोही मध्यंतरी व्हायरल झाला होता.  आता सिनेमाबाबतीत काही अपटेड समोर आले आहेत. 

विक्रांत मेस्सी लवकरच 'व्हाइट' सिनेमाचं शूटिंग सुरु करणार आहे. आध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या आयुष्यावर सिनेमा आधारित आहे. मिडिया रिपोर्टनुसार, या सिनेमाचं ९० टक्के शूट हे दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात होणार आहे. हा फक्त बायोपिक नाही तर कोलंबियामध्ये ५२ वर्षांपासून सुरु असलेला संघर्ष रविशंकर यांनी शांततेच्या मार्गाने मिटवला होता. सर्व घटना या कोलंबियातील असल्याने सिनेमाचं शूट तिकडेच होणार आहे. 

विक्रांत मेस्सीने नुकतंच बंगळुरुतील आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमाला भेट दिली. यावेळी त्याने रविशंकर यांनी सुरु केलेल्या हॅपीनेस प्रोग्रॅममध्येही सहभाग घेतला. तिथे त्याने ध्यान, प्राणायम, योग साधना यासोबत रविशंकर यांची विचारधारा समजून घेण्याचा प्रयत्न  केला. सिनेमात काम करताना काहीही बनावट किंवा दिखावा वाटू नये यासाठी त्याने सर्व गोष्टींचं निरीक्षण केलं. विक्रांतने आपल्या लूकमध्येही काही बदल करायला सुरुवात केली आहे. त्याने केस आणि दाढी वाढवली आहे. तसंच रविशंकर यांची बोलण्याची स्टाईल, हसणं, चालणं हे सगळं आत्मसात करायला सुरुवात केली आहे. तो त्यांच्या प्रवचनाचे व्हिडिओही बघत आहे. काही दिवसांनी विक्रांत शूटसाठी कोलंबियाला रवाना होणार आहे. 

टॅग्स :विक्रांत मेसीअध्यात्मिककोलंबियाबॉलिवूड