बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. बिग बी कुटुंबासोबत मुंबई येथील 'जलसा' बंगल्यात राहतात. या 'जलसा' बंगल्याबाबत प्रेक्षकांमध्ये नेहमीच कुतूहल असते. मात्र, आता एका प्रसिद्ध अभिनेत्याने थेट बिग बींच्या बाथरूममधील फोटो शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. अमिताभ बच्चन यांच्या घरात चक्क 'सोन्याचे शौचालय' असल्याचा दावा या फोटोद्वारे करण्यात आला असून हा फोटो आता तुफान व्हायरल होत आहेत.
प्रसिद्ध अभिनेता विजय वर्माने सोशल मीडियावर सुरू असलेल्या '२०२६ इज द न्यू २०१६' या ट्रेंडचा भाग म्हणून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. २०१६ मधील काही खास फोटो शेअर करताना विजयने अमिताभ बच्चन यांच्या घरातील एका सेल्फीने सर्वांचे लक्ष वेधले. कॅप्शनमध्ये विजयने लिहिले की, "२०१६ हे वर्ष माझ्यासाठी खूप खास ठरलं. मला 'पिंक' चित्रपटात बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाली. याच काळात मी अमिताभ बच्चन यांच्या घरातील 'गोल्डन टॉयलेट' सोबत सेल्फी काढला होता". विजयनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये बाथरूममधील कमोड चकाकणाऱ्या सोनेरी रंगाचे दिसतंय.
हा फोटो समोर येताच चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने म्हटले, "हा खरा मेगास्टारचा स्वॅग आहे". तर दुसऱ्याने विनोदाने लिहिले, "विजयने पहिल्यांदाच इतकं आलिशान टॉयलेट पाहिलं असावं म्हणून त्याने सेल्फी काढला".
सध्या विजय वर्मा यशाच्या शिखरावर असून, नुकताच तो 'गुस्ताख इश्क' मध्ये नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत दिसला. तर लवकरच तो 'मटका किंग'मध्ये झळकणार आहे. यामध्ये तो १९६० च्या दशकातील मुंबईतील कापूस व्यापारी आणि जुगार विश्वातील किंगची भूमिका साकारताना दिसेल.
Web Summary : Actor Vijay Varma shared a photo with what he called Amitabh Bachchan's 'golden toilet,' taken during 'Pink' filming. The picture went viral, prompting humorous reactions from fans online. Varma is currently enjoying success, recently appearing in 'Gustakh Ishq'.
Web Summary : अभिनेता विजय वर्मा ने अमिताभ बच्चन के 'गोल्डन टॉयलेट' के साथ एक तस्वीर साझा की, जो 'पिंक' की शूटिंग के दौरान ली गई थी। तस्वीर वायरल हो गई, जिससे प्रशंसकों की हास्यपूर्ण प्रतिक्रियाएं आईं। वर्मा वर्तमान में सफलता का आनंद ले रहे हैं, हाल ही में 'गुस्ताख इश्क' में दिखाई दिए।