Join us

विजय सेतुपतिने वजन कमी न केल्यामुळे नाराज झाला आमिर खान, 'लाल सिंग चड्ढा'मध्ये मानव विजला केलं कास्ट

By गीतांजली | Updated: December 10, 2020 13:31 IST

आमिरने या भूमिकेसाठी मानव विजची निवड केली आहे.

आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमात साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतिला  मानव विजने रिप्लेस केलं आहे. कारण ही आहे त्याच वजन आहे. विजय या सिनेमात विजय बुब्बाची भूमिका साकारणार होता. खुद्द विजयनेही गोष्ट कन्फर्म केली आहे. आता अशी बातमी समोर आली आहे, की विजयच्या भूमिकेला घेऊन कमिटमेंटला आमिर खान खूश नव्हता.

मुंबई मिररने दिलेल्या रिपोर्टनुसार, विजय या भूमिकेसाठी वजन कमी करण्यात अपयशी ठरला आहे. त्यानंतर आमिरने या भूमिकेसाठी मानव विजची निवड केली आहे. विजय सेतुपतींच्या जागी मानव विज या सिनेमात कास्ट करण्याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. दोन प्रतिभावान कलाकार एकत्र पडद्यावर पाहण्याची अपेक्षा असलेल्या चाहत्यांसाठी ही बातमी निराशाजनक आहे.

'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट टॉम हँक्सचा फॉरेस्ट गम्पपासून प्रेरीत होऊन बनवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. 

टॅग्स :आमिर खान