Join us
Daily Top 2Weekly Top 5

View Pics : बेस्ट फ्रेंडसोबत फिरायला निघाली अक्षयकुमारची लाडकी नितारा; पहा तिचे क्यूट फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 21:54 IST

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार जेव्हा-जेव्हा त्याच्या लाडक्या निताराचा फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो तेव्हा-तेव्हा त्याचा हाच प्रयत्न असतो की, ...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार जेव्हा-जेव्हा त्याच्या लाडक्या निताराचा फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो तेव्हा-तेव्हा त्याचा हाच प्रयत्न असतो की, मुलीचा चेहरा दिसू नये. अक्षयचे नेहमीच धोरण राहिले आहे की, आपल्या लाडकीला शक्य होईल तेवढे मीडियापासून दूर ठेवावे. बºयाचदा असेही म्हटले गेले की, अक्षय आणि त्याची पत्नी ट्विंकल मुलांविषयी नेहमीच प्रोटेक्टिव्ह राहिले आहेत. हे दोघेही आपल्या मुलांना ग्लॅमरच्या दुनियेपासून या वयात दूर ठेवू इच्छितात. मात्र, आमच्या हातात अक्षयच्या लाडक्या निताराचे असे काही फोटो लागले आहेत, ज्यामध्ये तिचा संपूर्ण चेहरा तर दिसतोच, शिवाय ती किती क्यूट आहे हेदेखील फोटोंवरून स्पष्ट होते. फोटोमध्ये नितारा इतकी क्यूट दिसत आहे की, बघणाºयांची तिच्या फोटोवरून नजर हटणार नाही. या फोटोंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नितारा पहिल्यांदाच तिच्या मम्मी-पप्पां व्यतिरिक्त फिरताना दिसत आहे. नितारासोबत तिची एक बेस्ट फ्रेंड असून, या दोघी हातात हात घेऊन अशा काही गप्पांमध्ये रंगलेल्या दिसत आहेत की कोणी त्यांचे फोटो टिपत आहे याचे त्यांना भान नाही. या दोघींनी एक सेकंदासाठीदेखील एकमेकींचा हात सोडलेला नाही. दोघीही त्यांच्याच दुनियेत रममाण असल्याचे दिसून येते. निताराप्रमाणेच तिची बेस्ट फ्रेंडही क्यूट असून, दोघींमधील मैत्री खूपच घनिष्ठ आहे, यात शंका नाही. बºयाच दिवसांनंतर अक्षयच्या चाहत्यांना त्याच्या चिमुकलीची ही झलक बघावयास मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा होईल असे म्हटले तर वावगे ठरू नये. असो, अक्षयच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास सध्या तो शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर तो त्याच्या परिवारालाही पुरेसा वेळ देत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या त्याच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. शंभर कोटीच्या क्लबमध्ये स्थान मिळविताना चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. असो, आता अक्षयची चिमुकली चाहत्यांची मने जिंकणार असून, तिच्या या अदा कशा वाटल्या या नक्कीच आम्हाला कळवा.