बॉलिवूडचा 'ॲक्शन किंग' विद्युत जामवाल नेहमीच आपल्या थरारक स्टंट्सनी प्रेक्षकांना थक्क करत असतो. विद्युतने नुकताच एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. या व्हिडीओमध्ये विद्युत आपल्या चेहऱ्यावर चक्क जळत्या मेणबत्तीचे गरम मेण ओतताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विद्युत जमिनीवर शांतपणे बसलेला दिसतोय. त्याच्यासमोर दोन जळत्या मेणबत्त्या आहेत. अचानक तो त्या मेणबत्त्या उचलतो आणि त्याचे गरम मेण थेट आपल्या चेहऱ्यावर ओतू लागतो. ही कृती पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "आपल्याला मर्यादांच्या पलीकडे जाण्याची ताकद देणाऱ्या प्राचीन कलरीपयट्टू आणि योग परंपरेला मानाचा मुजरा. मेणबत्त्यांचे गरम मेण आणि डोळ्यांवरील पट्टी... खऱ्या योद्धा वृत्तीचा जिवंत पुरावा!".
अदा शर्माची कमेंट आणि चाहत्यांच्या प्रतिक्रियाविद्युतचा हा व्हिडीओ पाहून त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री अदा शर्मा हिने कमेंट केली की, "तू स्टेजला आणि स्वतःला आग लावलीस!". अनेक चाहत्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले, "हे पाहून माझ्या अंगालाच मुंग्या आल्या". तर दुसऱ्याने लिहिले, "तू आपल्या देशाचा खरा अभिमान आहेस, पण स्वतःची काळजी घे". विद्युत जामवालचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Web Summary : Vidyut Jammwal shocked fans by pouring hot candle wax on his face in a daring stunt. He dedicated the act to ancient Kalaripayattu and yoga traditions, showcasing his warrior spirit. The video went viral, drawing reactions from fans and actress Ada Sharma.
Web Summary : विद्युत जामवाल ने अपने चेहरे पर जलती मोम डालकर प्रशंसकों को चौंका दिया। उन्होंने इस स्टंट को प्राचीन कलारीपयट्टू और योग परंपराओं को समर्पित किया, अपनी योद्धा भावना का प्रदर्शन किया। वीडियो वायरल हो गया, जिस पर प्रशंसकों और अभिनेत्री अदा शर्मा की प्रतिक्रियाएं आईं।