Join us

हॉट फोटोशूट का करत नाही? नेटकऱ्याच्या प्रश्नावर विद्या बालनने दिलं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:50 IST

Vidya balan: अलिकडेच विद्याने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन ठेवलं होतं. यामध्ये नेटकऱ्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले.

कलाविश्वातील झिरो फिगरचा ट्रेंड मोडीत काढणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विद्या बालन.  आपल्या उत्तम अभिनयशैलीतून विद्याने सौंदर्याची परिभाषा जगाला दाखवली. सौंदर्य म्हणजे केवळ सुंदर दिसणं, बारीक असणं नव्हे तर तुमच्या अंगी असलेले कलागुण महत्त्वाचे हे तिने सांगितलं. सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये विद्याचा एक दबदबा आहे. विशेष म्हणजे कोणतंही ग्लॅमरस फोटोशूट वा बोल्ड फोटोशूट करुन विद्या कधीच चर्चेत येत नाही. त्यामुळे हॉट फोटोशूट कधी करणार असा प्रश्न एका नेटकऱ्याने विद्याला विचारला. या प्रश्नावर अभिनेत्रीने भन्नाट उत्तर दिलं आहे.

अलिकडेच विद्याने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन ठेवलं होतं. यामध्ये नेटकऱ्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. विशेष म्हणजे यात तू हॉट फोटोशूट का करत नाही? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला. त्यावर विद्याने भन्नाट उत्तर देत त्याची बोलती बंद केली.

विद्याने या प्रश्नाचं उत्तर देत तिचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिचा चेहरा पूर्णपणे घामाने भिजलेला होता. सोबत "सध्या उन्हाळा सुरु आहे आणि या दिवसात मी फोटोशूट करते. मग झालं ना हॉट फोटोशूट",असं भारी उत्तर तिने या युजरला दिलं. तिचं हे उत्तर ऐकल्यावर नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं. तर, प्रश्न विचारणाऱ्याची मात्र चांगलीच बोलती बंद झाली.

दरम्यान, विद्या लवकरच जलसा या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शेफाली शाह स्कीन शेअर करणार आहे. विद्याने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'द डर्टी पिक्चर', 'परिणीता', 'लगे रहो मुन्नाभाई', 'भुलभुलैय्या', 'कहानी' या चित्रपटातून तिने तिचं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. 

टॅग्स :विद्या बालनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा