Join us  

Vidya balan: 'या' कारणामुळे विद्या बालनचं वजन होत नाही कमी; वेट लॉसच्या नादात रुग्णालयात झाली होती दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 2:57 PM

Vidya balan: एका मुलाखतीत विद्याने तिच्या वाढत्या वजनाविषयी एक खुलासा केला आहे. तिचं वजन का कमी होत नाही हे तिने सांगितलं आहे.

विचारांनी बोल्ड असणारी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (Vidya balan). ‘परिणिता’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘डर्टी पिक्चर’, ‘पा’ अशा अनेक चित्रपटांमधून विद्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. परंतु, उत्तम अभिनयकौशल्य असतांना विद्याला अनेकदा तिच्या वाढत्या वजनामुळे सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं. अगदी तरुणावस्थेत असतानाही तिला बॉडीशेमिंगसारखा प्रकाराला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळेच अनेकदा विद्याने तिच्या बॉडी शेमिंगविषयी, ट्रोलिंगविषयी उघडपणे तिचं मत मांडलं आहे. एका मुलाखतीत विद्याने तिच्या वाढत्या वजनाविषयी एक खुलासा केला आहे. तिचं वजन का कमी होत नाही हे तिने सांगितलं आहे. तसंच वजन कमी करायच्या नादात तिला एकेकाळी हॉस्पिटलची पायरी चढावी लागली होती हेदेखील तिने सांगितलं.

या कारणामुळे विद्याला चढावी लागली हॉस्पिटलची पायरी

साधारणपणे वयाच्या १७ व्या वर्षी विद्याने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दररोज १० लीटर पाणी प्यायलं तर वजन कमी होतं असा सल्ला तिला कोणी तरी दिला. त्यामुळे वजन कमी करायच्या नादात विद्याने कोणताही विचार न करता प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायला सुरुवात केली. परिणामी, वजन कमी होण्यापेक्षा तिला उलट्यांचा त्रास सुरु झाला. सतत मळमळ आणि उलट्या हा नवा त्रास सुरु झाल्यामुळे विद्याला डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली. या प्रकारानंतर विद्याने जास्त पाणी पिण्याचा प्रयोग कधीही केला नाही.

...म्हणून विद्याचं वजन कमी होत नाही

एका मुलाखतीमध्ये विद्याने तिचं वजन कमी न होण्यामागील कारण सांगितलं. माझ्यात हार्मोनल इंम्बॅलेन्सची समस्या आहे. त्यामुळे मी कितीही डाएट केलं, वर्कआऊट केलं किंवा वजन कमी करण्यासाठी कोणताही नवा प्रयोग करुन पाहिला तरीदेखील माझ्या वजनात काही फरक पडत नाही. या हार्मोनल इम्बॅलेन्समुळे माझं वजन कमी होत नाही, असं विद्याने सांगितलं.

दरम्यान, विद्या तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असते. २००७ मध्ये 'भूलभुलैय्या' या चित्रपटासाठी तिने प्रचंड मेहनत घेऊन वजन कमी केलं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती.

टॅग्स :विद्या बालनसेलिब्रिटीबॉलिवूड