Join us  

Video : विद्या बालनकडे आहे गुडन्यूज, हा आहे त्याचा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 12:12 PM

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन तिच्या पर्सनल आयुष्याबाबत कमी आहे सिनेमातील भूमिकेंबाबत जास्त चर्चेत असते. मात्र सध्या विद्याच्या पर्सनल लाईफची खूप चर्चा होतेय.

ठळक मुद्देप्रसिद्ध निर्माते रॉनी स्क्रूवालाच्या पार्टीनंतर हा व्हिडिओ आहे शेवटची विद्या 'तुम्हारी सुलु'मध्ये दिसली होती

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन तिच्या पर्सनल आयुष्याबाबत कमी आहे सिनेमातील भूमिकेंबाबत जास्त चर्चेत असते. मात्र सध्या विद्याच्या पर्सनल लाईफची खूप चर्चा होतेय. विद्याकडे गुडन्युज असल्याचे बोलले जातेय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विद्या प्रेग्नेंट असल्याची चर्चा होतेय.    प्रसिद्ध निर्माते रॉनी स्क्रूवालाच्या पार्टीनंतर हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत भूमी पेडणेकर सुद्धा दिसतेय. वूम्पलाने हा व्हिडिओ इन्टांग्रामवर शेअर केला आहे.  या व्हिडिओमध्ये विद्या ओढणीने बेबी बम्प लापवताना दिसतेय. अजून तिच्या कडून किंवा तिच्या पतीकडून कोणतेच अधिकृत वक्तव्य आलेले नाही. शेवटची विद्या 'तुम्हारी सुलु'मध्ये दिसली होती.  या सिनेमासाठी तिला अवॉर्ड देखील मिळाले होते.  

काही दिवसांपूर्वी विद्या बालन आगामी सिनेमासाठी नितीन शंकर यांच्याकडून हार्मोनियमचे ट्रेनिंग घेत असल्याची चर्चा  रंगली होती. मात्र अद्याप ती कोणत्या सिनेमासाठी प्रशिक्षण घेते आहे, हे समजू शकलेले नाही. ती लवकरच तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत सिनेमाच्या चित्रीकरणाला हैदराबादमध्ये सुरूवात करणार आहे. या सिनेमासाठी ती रामाराव यांच्या पत्नी बासव तारकम यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी विद्या हार्मोनियम शिकत असल्याचा तर्क लावला जातो आहे. मात्र आता प्रग्नेंसीच्या चर्चेमुळे विद्या सिनेमात काम करणार की नाही यावर प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.  

टॅग्स :विद्या बालनबॉलिवूड