Join us
Daily Top 2Weekly Top 5

​महिला दिनी काजोलने पोस्ट केला असा व्हिडिओ की, क्षणात झाला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 13:29 IST

बॉलिवूड अभिनेत्री काजोल दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. आज जागतिक महिला दिनी काजोलने महिलांना अगदीच वेगळ्या अंदाजात महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. आज जागतिक महिला दिनी काजोलने महिलांना अगदीच वेगळ्या अंदाजात महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. काजोलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘फाईट लाईक अ वूमेन, हॅपी वूमेन्स डे’, या कॅप्शनसह तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यातील काजोलचा मस्तमौला अंदाज बघण्यासारखा आहे. या व्हिडिओत काजोल ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टॉप आणि ब्ल्यू जीन्समध्ये अतिशय सुंदर दिसतेय. तिचा बिनधास्त अवतार तर पाहण्यासारखा आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांनाही कमालीचा भावला आहे. त्यामुळेच काजोलने हा व्हिडिओ पोस्ट करताच तो        वा-याच्या वेगाने व्हायरल होतो आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहा आणि कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.ALSO READ : ​OMG! काजोल तिच्या मुलांकडून करून घेते ही घरची कामं2015 मध्ये रिलीज झालेल्या ‘दिलवाले’मध्ये काजोल अखेरची दिसली होती. या चित्रपटात ती शाहरूख खानसोबत दिसली होती. काजोल व शाहरूखची जोडी बॉलिवूडच्या सुपरहिट जोड्यांपैकी एक मानली जाते. या जोडीने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’,‘कुछ कुछ होता है’,‘कभी खुशी कभी गम’, ‘बाजीगर’ अशा सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे.लवकरच काजोल होम प्रॉडक्शनच्या चित्रपटात दिसणार आहे.‘इला’ असे या चित्रपटाचे नाव आहे.  दिग्दर्शन प्रदीप सरकार या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. या चित्रपटात काजोल पुन्हा एकदा सिंगल मदरच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी ‘वी आर फॅमिली’ या चित्रपटात तिने सिंगल मदरची भूमिका वठवली होती. यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर काजोल पुन्हा याच धाटणीच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. चित्रपटाची कथा आई आणि मुलांमधील संबंधांवर आधारित असून, काळजाचा ठाव घेणारी असल्याचे कळतेय.  या चित्रपटासाठी काजोलची निवड अचूक आहे, असे प्रदीप सरकार यांचे मत आहे. आपल्याही मनात याबद्दल शंका नसावी.