बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या रात्री हल्ला झाला. घरात चोरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीशी त्याची झटापट झाली. त्यानंतर हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले. यामध्ये अभिनेत्याच्या मानेला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. शस्त्रक्रियेनंतर सैफची प्रकृती आता सुधारली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याच दरम्यान बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने सैफवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राखी सावंतचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. "अरे, तू सेलिब्रिटी आहेस, तुला स्वत:ची फिकीर नसेल पण सैफू करुची काळजी घे, बेडरुम, बाथरुममध्ये कॅमेरे लाव" असा सल्ला राखीने अभिनेत्याला दिला आहे. "मी दुबईत बसली आहे. ही खरच धक्कादायक बातमी आहे. सैफ अली खान, करीना कपूरच्या घरात चोराने घुसून त्याच्यावर चाकूने वार केले. ओह माय गॉड, सैफ इतका करोडपती आहेस, मग सीसीटीव्ही कॅमेरे का नाही लावलेस?"
"मजल्यावर, इमारतीत, कारच्या जवळ, घराच्या आतमध्ये कॅमेरे का लावले नाहीस? इतके नोकर-चाकर आहेत, मग कॅमेरे का लावले नाहीस?" असा सवाल राखी सावंतने सैफ अली खानला विचारला आहे. "प्रत्येक जागी... बेडरुम, बाथमरुमध्ये कॅमेरे लावं. पर्सनल लाइफच जे आहे, ते डिलीट कर. आता बघ किती महागात पडलं. एक मोठी स्क्रीन बसव."
"घराच्या बाहेरुन कोण आतमध्ये येतं, बाहेर जातं, ते सर्व रेकॉर्ड होईल. अरे, तू सेलिब्रिटी आहेस. तुला स्वत:ची फिकीर नसेल, तर करीनाची फिकीर कर. करीना माझी जान आहे, माझी मैत्रीण आहे. सैफू करुची काळजी घे. सैफू तू खरा हिरो निघालास. मी तुझे रेस १,२,३ चित्रपट बघितलेत. मला वाटायचं अक्षय कुमार स्टंट करतो, पण तू पण खरा हिरो निघालास" असं राखी सावंतने म्हटलं आहे.