Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: आलिया भट बनली शहेनशाह,पण किंग खानला नाही आवडलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 06:00 IST

आज खूश तो बहुत होगे तुम...जो  आज  तक  तुम्हारे  मंदिर  की  सीढियां   नहीं  चढ़ा  ….जिसने  कभी  तुम्हारे  सामने हाथ  नहीं  जोड़े वो  आज  तुम्हारे  सामने  हाथ  फैलाये  खड़ा  है...' असे बिग बींचे डायलॉग आलिया बोलत आहे.

किंग खान शाहरुख आणि अभिनेत्री आलिया भट यांनी 'डिअर जिंदगी' या सिनेमात एकत्र काम केलं. या सिनेमात दोघांची भूमिका आणि केमिस्ट्री रसिकांना बरीच भावली. लवकरच शाहरुख 'झीरो' सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात शाहरुख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. सध्या शाहरुख आणि आलिया भटचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये किंग खान आणि आलिया स्टेजवर धम्माल करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया बिग बी अमिताभ यांचे गाजलेले डायलॉग बोलताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.

या व्हिडीओमध्ये आलिया बिग बी अमिताभ यांच्या सुपरहिट 'दिवार' सिनेमातील गाजलेला डायलॉग बोलताना पाहायला मिळत आहे. बिग बींचे हे डायलॉग मोठ्या निष्ठेने आणि वेगळ्या ढंगात ते डायलॉग बोलत आहे. मात्र त्याचवेळी शाहरुख आलियाचं लक्ष विचलित करून तिच्या डायलॉगमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. दोघांची ही जुगलबंदी पाहून व्हिडीओमधील कार्यक्रमस्थळी उपस्थित असणारे बॉलीवुडचे दिग्गज खळखळून हसत आहेत. यांत अभिनेत्री रेखा, झीनत अमान, हेमामालिनी पोट धरून हसत आहेत. शाहरुख-आलियाची ही धम्माल साऱ्यांनाच भावते आहे.

आज खूश तो बहुत होगे तुम...जो  आज  तक  तुम्हारे  मंदिर  की  सीढियां   नहीं  चढ़ा  ….जिसने  कभी  तुम्हारे  सामने हाथ  नहीं  जोड़े वो  आज  तुम्हारे  सामने  हाथ  फैलाये  खड़ा  है...' असे बिग बींचे डायलॉग आलिया बोलत आहे. दुसरीकडे शाहरुख भोंगा वाजवत किंवा विविध हरकती करत आलियाचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. शाहरुखने कितीही त्रास दिला तरी आलिया काही डायलॉग बोलणं थांबवत नाही. 

टॅग्स :आलिया भटशाहरुख खान