झी सिने पुरस्कार २०२६ सोहळा (Zee Cine Awards 2026) यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्यात हजर होते. यंदाचा झी सिने पुरस्कार २०२६ सोहळा हा 'FANtertainment’' या संकल्पनेवर आधारित होता. या भव्य सोहळ्यात अभिनेता विकी कौशल याच्या परफॉर्मन्सने विशेष लक्ष वेधून घेतले.
विकी कौशलने या भव्य सोहळ्यात मराठा योद्ध्यांना सलामी दिली. महाराष्ट्राच्या परंपरा, शौर्य आणि वैभवाचे दर्शन घडवणारा एक विशेष कार्यक्रम विकीने सादर केला. नाशिक ढोलचा कडकडाट, हवेत फडकणारे भगवे झेंडे आणि पारंपारिक वेशभूषेतील मावळ्यांच्या सोबतीने विकीने हत्तीवरुन स्टेजवर एन्ट्री घेतली. याचा व्हिडीओ विकी कौशलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
केवळ परफॉर्मन्सच नाही, तर अभिनयाच्या जोरावरही विकीने या सोहळ्यात बाजी मारली. 'छावा' या ऐतिहासिक चित्रपटातील त्याच्या अजरामर कामगिरीसाठी विकी कौशलला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटात त्याने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली होती, ज्याचे कौतुक जगभरातील प्रेक्षकांनी केले आहे.
कधी आणि कुठे पाहता येईल हा सोहळा?विकी कौशलचा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा परफॉर्मन्स आणि झी सिने पुरस्कारांमधील इतर अनेक खास क्षण प्रेक्षकांना आज, रविवार १५ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता पाहता येणार आहेत. हा सोहळा झी सिनेमा, झी टीव्ही आणि झी५ (ZEE5) या प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाईल.
Web Summary : At Zee Cine Awards 2026, Vicky Kaushal paid tribute to Maratha warriors with a grand performance. He also won Best Actor for 'Chhava,' portraying Sambhaji Maharaj. The show airs March 15 on Zee Cinema, Zee TV, and ZEE5.
Web Summary : ज़ी सिने अवार्ड्स 2026 में, विक्की कौशल ने मराठा योद्धाओं को एक शानदार प्रदर्शन के साथ श्रद्धांजलि दी। उन्होंने 'छावा' के लिए सर्वश्रेष्ठ अभिनेता का पुरस्कार भी जीता, जिसमें उन्होंने संभाजी महाराज की भूमिका निभाई। शो 15 मार्च को ज़ी सिनेमा, ज़ी टीवी और ज़ी5 पर प्रसारित होगा।