Join us

या सिनेमासाठी विकी कौशलला करण्यात आले होते रिजेक्ट, फरहान अख्तरची झाली होती निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 19:45 IST

एका मुलाखती दरम्यान विकीने हा स्वत: खुलासा केला होता.

तो आला त्यांने पाहिले त्यांने जिंकला असे काहीसे म्हणावे लागले अभिनेता विकी कौशलच्या बाबत. 'उरी' सिनेमाच्या यशानंतर विकी कौशल हे नाव घराघरात पोहोचले आहे. विकीने 'लव शव ते चिकन खुराना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते मात्र त्याला ओळख मिळाली ती 'मसान' सिनेमातून. मसान हा त्याच्यासाठी टर्निंग पाईंट ठरला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. काही महिन्यांपूर्वी एका इंटरव्हु दरम्यान विकीने सांगितले की, स्ट्रगलच्या दिवसात त्यांने अनेक ठिकाणी ऑडिशन दिले होते मात्र त्याला त्याठिकाणी रिजेक्शनचा सामान करावा लागला होता. 

फरहान अख्तरचा हिट सिनेमा 'भाग मिल्खा भाग'साठी देखील विकीने ऑडिशन दिले होते मात्र त्याला इथेही रिजेक्शनचा समाना करावा लागला होता. हा सिनेमा मिल्खा सिंग यांचा बायोपिक होता. त्यानंतर ही विकीने आपले प्रयत्न सुरुच ठेवले. आता त्याला उरीच्या निमित्ताने यशदेखील मिळाले.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर उरीचा दिग्दर्शक आदित्य धरसोबत विकी पुन्हा एकदा काम करणार आहे. 'अश्वत्थामा'वर सिनेमा तयार करत आहेत. यात विकी गुरू द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामाचीच भूमिका साकारणार आहे. . तो इज्राइल मार्शल आर्ट आणि जपानी मार्शल आर्ट्स शिकणार आहे. तसेच सिनेमात रॉयल लूक येण्यासाठी तो तलवारबाजी आणि तिरंदाजीचे प्रशिक्षणसुद्धा घेणार आहे.

टॅग्स :विकी कौशल