Join us

कतरिना-विकीच्या लग्नावरील मीम्स पाहून लोटपोट होऊन हसाल, रणबीर-सलमानलाही घेतलं जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 14:57 IST

Vicky-Katrina Wedding Memes : काही यूजर्सनी कतरिना कैफचा कथित बॉयफ्रेन्ड सलमान खान आणि कन्फर्म एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर यांच्यावरून हे भन्नाट मीम्स तयार केले आहेत. हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Vicky-Katrina Wedding: तुम्ही जर सोशल मीडियावर असाल तर कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नावरून सुरू असलेली चर्चा तुम्हाला माहीत असेलच. सगळीकडे एकच चर्चा आहे की, कपल ९ डिसेंबरला सवाई माधोपूर, राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नात फारच कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पाहुण्यांनाही मोबाइल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. अशातच सोशल मीडियावर काही भन्नाट मीम्स  व्हायरल (Viral Memes) झाले आहेत. जे बघून तुम्ही पोट धरून हसाल.

काही यूजर्सनी कतरिना कैफचा कथित बॉयफ्रेन्ड सलमान खान आणि कन्फर्म एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर यांच्यावरून हे भन्नाट मीम्स तयार केले आहेत. हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

विकी आणि कतरिना ९ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे सध्या सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांमध्ये या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या शाही विवाहसोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलमिम्ससोशल व्हायरल