Join us

प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते कुलजीत पाल यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 13:49 IST

Kuljit pal: वयाच्या ९० व्या वर्षी कुलजीत यांनी अखेरचा श्वास घेतला.

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते कुलजीत पाल यांचं निधन झालं आहे. २४ जून रोजी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकजण त्यांना आदरांजली अर्पण करत आहेत.  कुलजीत पाल हे गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते. यामध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. कुलजीत पाल यांचे मॅनेजर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

कुलजीत यांनी बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेले सिनेमा दिले होते. यात 'अर्थ', 'आज', 'परमात्मा', 'वासना', 'दो शिकारी' आणि 'आशियाना' यासारख्या  हिट सिनेमांची निर्मिती त्यांनी केली होती. विशेष म्हणजे कुलजीत यांनीच रेखाला पहिला ब्रेक दिला होता.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुझ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसंच २९ जून रोजी संध्याकाळी ५ ते ६ या वेळात शोकसभेचे आयोजन करण्यात आलं आहे.

 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमारेखा