Join us  

झीनत अमान कोणाला करत आहेत डेट? तरुणांना सल्ला देत म्हणाल्या, "कुटुंबाचा विरोध असेल तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 4:48 PM

झीनत अमान सध्या तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) युवा पिढीशी खूपच जोडलेल्या आहेत. सोशल मीडियावर एन्ट्री घेताच त्यांनी पोस्टच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाय त्यांच्या दिलखुलास मुलाखतीही व्हायरल होत आहेत. इन्स्टाग्रामवर त्या चांगल्याच लोकप्रिय ठरत आहे. Gen z ला अनेक महत्वाचे सल्ले त्या देताना दिसतात.  तुमच्या लग्नाला कुटुंबाचा विरोध असेल तर काय कराल यावर झीनत अमान यांनी उत्तर दिलं आहे.

झीनत अमान यांनी नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. डेटिंग अॅप बंबलशी कोलॅबोरेशनमध्ये त्यांनी लिहिले, "जर तुमचं कुटुंब तुमच्या प्रेमाला जात, धर्म, लिंग किंवा इतर कारणांमुळे विरोध करत असेल तर त्यांना आव्हान द्या. पण त्यांना मुळातच तुमचा पार्टनर आवडत नसेल तर त्यांचं नीट ऐकून घ्या. मी असं नाही म्हणत की ते बरोबरच असले पाहिजे. आपल्या प्रियजनांचा बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी वेगळा असू शकतो जे ते आपल्याला दाखवत असतील असं माझं म्हणणं आहे. माझ्यावरही एक दोन वेळा अशी वेळ आली होती जेव्हा मी माझ्या आईचं ऐकायला हवं होतं असं आता मला वाटतं."

नव्या व्यक्तीला डेट करण्यापूर्वी झीनत अमान यांनी तरुणांना सल्ला दिला की, "नात्यात सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला काहीच समजणार नाही. हे तसं बघायला गेलं तर आकर्षण असतं. याला प्रेम समजू नका. सध्या मी स्वत:लाच डेट करत आहे. मी स्वत:साठी त्या सर्व गोष्टी करते जे एखादा लाँग टर्म पार्टनर आपल्यासाठी करेल. जर तुम्हाला असा पार्टनर मिळत नसेल तर हे स्वत:वर प्रेम करण्यासाठी पुष्कळ आहे."

टॅग्स :झीनत अमानबॉलिवूडलग्नरिलेशनशिप