Join us

वरूणचा जुळा भाऊ टिवटरवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 17:44 IST

दिग्दर्शक डेव्हिड धवनला दोन मुलं - रोहित धवन आणि वरूण धवन. मग हा वरूण धवनचा जुळा भाऊ कुठून आला? ...

दिग्दर्शक डेव्हिड धवनला दोन मुलं - रोहित धवन आणि वरूण धवन. मग हा वरूण धवनचा जुळा भाऊ कुठून आला? असे तुम्हाला वाटलेच असेल. पण, तुम्ही विचार करताय तसं काहीही नाहीये. कारण वरूणला जुळा भाऊ नाहीये. तो सध्या ‘जुडवा २’ च्या प्रमोशनमध्ये बिझी असून त्यात तो दुहेरी भूमिकेत आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्याने टिवटरवर त्याचा भाऊ ‘राजा’चे अकाऊंट ओपन केले आहे आणि त्याच्या फॉलोअर्सला विनंती केली आहे की, ‘राजा’ लाही तुम्ही फॉलो करा. ‘गिव्ह सम लव्ह टू माय ट्विन ब्रदर राजा ही इज न्यू टू ट्विटर फॉलो हिम.’ ‘जुडवा २’ मध्ये मुख्य भूमिकेत जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू या अभिनेत्री आहेत. जॅकलीन वरूणची मजा करण्याची ही संधी कशी सोडेल? तिने वरूणच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. ‘वेलकम राजा विथ सम बँड बाजा.’ ‘राजा’च्या अकाऊंटला आत्तापर्यंत १००० फॉलोअर्स झाले असून वरूण आणि तापसी देखील त्याचे फॉलोअर आहेत. वरूणचा हा प्रमोशनचा फंडा बाकी एकदम मस्त आहे नाही का?