Join us

वरूण करत नाही इतरांची ‘कॉपी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 16:21 IST

 अभिनेता वरूण धवन हा जॉन अब्राहमसोबत ‘ढिशूम’ चित्रपटात दिसणार आहे. वरूण म्हणतो,‘ मी कुणाचीही कॉपी करत नाही. स्वत:च्या स्टेप्स ...

 अभिनेता वरूण धवन हा जॉन अब्राहमसोबत ‘ढिशूम’ चित्रपटात दिसणार आहे. वरूण म्हणतो,‘ मी कुणाचीही कॉपी करत नाही. स्वत:च्या स्टेप्स करण्यावर मी विश्वास ठेवतो. मी सध्या बॉलीवूडमध्ये सर्वांत लहान आहे. १९९० पासून मी सलमान भाई, आमीर खान, शाहरूख खान यांचे चित्रपट पाहत आलोय.तसेच मी जॉनचेही सर्व चित्रपट पाहिले आहेत. जर तुम्ही विचारले की, ‘ढिशूम’ मध्ये एखादा तरी सीन असेल की जो तू कॉपी केला असशील? तर हो. तुम्ही पाहाल. त्यात आम्ही दोघांनीही केशरी रंगाची अंडरविअर घातलेली आहे. बस्स..तेवढाच सीन आम्ही एकमेकांसारखा केला आहे. आणि तेही दिग्दर्शकाच्या म्हणण्यावरून.’