Join us

वरुण धवनची गाडी सुसाट...

By admin | Updated: February 6, 2016 02:36 IST

रोहित धवन दिग्दर्शित चित्रपट ‘ढिशुम’मध्ये वरुण धवन एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. तो सध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असून स्पीडबोट चालवण्याचा सराव करत आहे.

रोहित धवन दिग्दर्शित चित्रपट ‘ढिशुम’मध्ये वरुण धवन एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. तो सध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असून स्पीडबोट चालवण्याचा सराव करत आहे. ढिशुम चित्रपट हा अ‍ॅक्शनपट असल्याने जास्त मेहनत घ्यावी लागत असल्याचे वरुण सांगतो. ‘ढिशुम’ चित्रपटाच्या शूटिंगमधील एक स्टील फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट करण्यात आला आहे. अबुधाबी येथे हाय आॅक्टेन अ‍ॅक्शन सिक्वेन्ससाठी तो स्पीडबोट चालवण्याची प्रॅक्टिस करतोय. सूत्रांच्या माहितीनुसार, वरुण सकाळी ६ वाजता उठतो. ट्रेनिंगसाठी तो संपूर्ण टीमच्या अगोदर उठतो. त्याची भूमिका जास्तीत जास्त परफेक्ट करण्यासाठी तो खूप मेहनत घेतोय. तो ३५ दिवसांसाठी यूएई मध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी असणार आहे.