Join us

वरुण धवनने केले गर्लफ्रेंड नताशा दलालला बर्थडे विश, लग्नाच्या चर्चांना पुन्हा उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 14:03 IST

वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांचे रिलेशन जगजाहिर आहे. सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तो गर्लफ्रेंड नताशा सोबत ...

वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांचे रिलेशन जगजाहिर आहे. सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तो गर्लफ्रेंड नताशा सोबत दिसला आणि त्यांनी फोटोसुद्धा काढले. वरुण आपल्या पर्सनल लाईफबद्दल खूप बोलत नाही त्याला आपली पसर्नल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगवेगळी ठेवायलाच आवडते.  नताशाचा आज बर्थडे आहे. या निमित्ताने वरुणने तिला विश केले आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार वरुण नाताशासोबत लग्नाला तयार आहे. मात्र तो कधी लग्न करणार हे माहिती नाही. वरुणने एका इंटरव्हु दरम्यान सांगितले होते की, ''मला लग्न करायचे आहे. माझे आई-वडिल यावर कैसे रिएक्ट होतील हे मला माहिती नाही आहे. पंजाबी असल्यामुळे त्यांची अपेक्षा असेल की मी पूर्ण ट्रेडिशनल पद्धतीने लग्न करावं.''   तसे पाहिला गेले तर वरुणचा मोठा भाऊ मॅरिड आहे त्यामुळे पुढचा नंबर हा वरुणचा असणार आहे. वरुण सध्या त्याच्या प्रोफेशन लाईफला घेईन खूप बिझी आहे.  काही दिवसांपूर्वी आलेला त्याच्या 'अक्टबूर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. सध्या तो मल्टी स्टारर 'कलंक'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात वरुणसह आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर दिसणार आहे. नुकतेच त्यांनी अनुष्का शर्माच्या 'सुई धागा'चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत झळकणार असून 'मौजी' असं त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव असेल.दुसरीकडे अनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणा-या ममताच्या भूमिकेत झळकणार आहे.'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणार आहे. यशरत कटारिया 'सुई धागा' या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून मनीष शर्मा सिनेमाचे निर्माते आहेत.यशराज बॅनरचा हा सिनेमा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.