Join us

लग्नाच्या आधीच वरुण धवनसाठी गर्लफ्रेंड नताशाने केले करवा चौथचे व्रत, समोर आला फोटो

By गीतांजली | Updated: November 5, 2020 17:47 IST

वरुण आणि नताशा बॉलिवूडमधले एक क्यूट कपल आहे.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची पत्नी अनिता कपूर यांनी घरी करवा चौथची पूजा केली गेली. या खास प्रसंगी संजय कपूरची पत्नी माहीप कपूर, डेव्हिड धवनची पत्नी लली आणि चंकी पांडेची पत्नी भावना दिसली. याशिवाय शिल्पा शेट्टी, कृष्णा लुल्ला, नीलम कोठारी आणि इतर सेलेब्रिटीसुद्धा सुनीताच्या घरी दिसल्या, पण सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते वरुण धवनची गर्लफ्रेंड नताशा दलालने. 

माहीप कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात नताशा दलाल लाल रंगाची साडी परिधान करुन  दिसते आहे. नताशाचे अद्याप वरुण धवनशी लग्न झालेले नाही, परंतु अभिनेत्याच्या दीर्घायुष्यासाठी तिने करवा चौथचे व्रत केल्याचे म्हटले जातंय. सोशल मीडियावर नताशा दलालचा हा फोटो खूप व्हायरल होतो आहे. नताशा यात खूपच सुंदर दिसते आहे. 

वरुण धवन आणि नताशा अनेकवेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. वरुण आणि नताशा बॉलिवूडमधले एक क्यूट कपल आहे. वरुण आणि नताशा एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की वरुण आणि नताशने या वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर अखेरपर्यंत लग्न करणार होते मात्र कोरोनामुळे त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आला. 

टॅग्स :वरूण धवन