‘व्हीआयपी २‘मध्ये काजोल साकारणार खलनायिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 17:19 IST
निर्माता दिग्दर्शक राजीव राय यांचा १९९७ साली प्रदिर्शित झालेला ‘गुप्त’ हा चित्रपट काजोलच्या चाहत्यांना आठवतच असेल. या चित्रपटात काजोलने ...
‘व्हीआयपी २‘मध्ये काजोल साकारणार खलनायिका!
निर्माता दिग्दर्शक राजीव राय यांचा १९९७ साली प्रदिर्शित झालेला ‘गुप्त’ हा चित्रपट काजोलच्या चाहत्यांना आठवतच असेल. या चित्रपटात काजोलने खुनी खलनायिकेची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा तशाच रूपात काजोल चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी ‘व्हीआयपी २’ या दाक्षिणात्या चित्रपटात ती खलनायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेचा सुपरस्टार धनुष याची मुख्य भूमिका असलेल्या ‘व्हीआयपी २’ या चित्रपटात काजोल सिंगल मदरची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ही भूमिका ‘ग्रे शेड’ असणारी आहे. ‘वेलैला पट्टधारी’ या चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ‘व्हीआयपी २’चे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून, यात क ाजोल काम करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. काजोलने ‘व्हीआयपी २’ ची पटकथा आवडली असल्याचे सांगितले होते. या चित्रपटात ती साकारत असलेली भूमिका चॅलेंजिंग असल्याने ही भूमिला करायला मजा येईल असेही ती म्हणाली होती. यावेळी आपल्या लूक बद्दलही आपले मत व्यक्त करताना ‘दुश्मन’ या चित्रपटातील माझा लूक सर्वांत खराब असल्याचे सांगितले होते. तिच्या या विधानाचा विचार केल्यास ‘व्हीआयपी २’मधील काजोलचा लूक काहीतरी वेगळा असेल असे वाटू लागले आहे. २० वर्षांआधी प्रदशित झालेल्या ‘गुप्त’ या चित्रपटात काजोलने ग्रे शेडची भूमिला रंगविली होती.मागील वर्षी काजोलचा ‘दिलवाले’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या ती शाहरुख खानच्या अपोझिट दिसली होती, मात्र चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर फारसे यश मिळविता आले नव्हते. दरम्यान ती रुपेरी पडद्यापासून दूर होती. अजय देवगनच्या होम प्रोडक्शनच्या ‘शिवाय’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काजोलने मोठी भूमिका बजावली असे सांगण्यात येते. शिवायने बॉक्स आॅफिसवर १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.