Join us

​युवी-हेजलची लगीनघाई...मोदींना दिले निमंत्रण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 15:30 IST

भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह आणि अभिनेत्री हेजल कीच या दोघांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. येत्या ३० नोव्हेंबरला ...

भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह आणि अभिनेत्री हेजल कीच या दोघांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. येत्या ३० नोव्हेंबरला युवराज व हेजल लग्नबंधनात अडकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे. युवराजने आई शबनम सिंह हिच्यासोबत  पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून त्यांना विवाहाचे निमंत्रण दिले. गुरुवारी सकाळी युवराज व शबनम संसदेत पोहोचले. येथे पंतप्रधानांसह काही मंत्री व खासदारांना युवराजने जातीने लग्नाचे निमंत्रण दिले.क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर युवराज व हेजलच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका  डिझाईन करण्यात आहे. प्रीमिअर लीग या स्पेशल नावाने तयार करण्यात आलेली ही निमंत्रण पत्रिका एकदम हटके आहे. युवराज व हेजलचे कार्टून आणि इलस्ट्रेशनचा वापर करून ती डिझाईन करण्यात आली आहे. पत्रिकेच्या प्रत्येक पानावर युवराज व हेजलची इलेस्ट्रेशन्स आहेत. येत्या ३० नोव्हेंबरला चंदीगडला पंजाबी पद्धतीने  युवराज व हेजल यांचा भव्य विवाह सोहळा होणार आहे. यानंतर २ डिसेंबरला गोव्यात हिंदू रिती-रिवाजाने युवराज व हेजल पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहेत. ५ डिसेंबरला दिल्लीस्थित छत्तरपूरच्या फार्म हाऊसवर ग्रँड रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड व राजकारणातील दिग्गज सहभागी होण्याचा अंदाज आहे.यावर्षीच्या प्रारंभी युवराज व हेजल यांचा साखरपुडा झाला होता. युवराजने सोशल मीडियावरून ही बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. सध्या युवराज टीम इंडियामध्ये नाही. यावर्षी मार्चमध्ये युवराज आॅस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० मॅच खेळताना अखेरचा दिसला होता. डिसेंबर २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तो शेवटचा वन-डे खेळला होता.