Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘बाहुबली २’च्या शूटिंगसाठी व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 21:50 IST

‘बाहुबली’ हा एक चित्रपट १०० चित्रपटांच्या बरोबर आहे, असे प्रभासने म्हटले होते. अर्थातच यात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला ...

‘बाहुबली’ हा एक चित्रपट १०० चित्रपटांच्या बरोबर आहे, असे प्रभासने म्हटले होते. अर्थातच यात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ‘बाहुबली’मध्ये आतापर्यंत भारतीय चित्रपटात न वापरलेले ‘व्हीआर’ तंत्रज्ञानाचा आविष्कार प्रेक्षकांना पहायला मिळेल असा दावा दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी केला आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी ‘बाहुबली २’च्या चित्रीकरणासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. ते म्हणाले, मी एखाद वेळी चांगला चित्रपट दिग्दर्शित करू शकणार नाही. मात्र मी चांगल्या पद्धतीने कथा सांगू शकतो, ही कथा त्या चित्रपटाच्या टेक्निशिअन्सच्या डोक्यात उतरायला हवी. ‘बाहुबली’च्या टेक्निशिअन्संनी कथेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. ‘बाहुबली’ हा पिरियेड चित्रपट आहे. तो लोकांना कंटाळवाणा वाटू नये यासाठी व्हियुअल इफेक्टस्ची मदत घेण्यात आली’.राजमौली म्हणाले, आम्ही शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच आम्ही व्हच्युअल रिआॅलिटी (व्हीआर)तंत्रज्ञानाचा वापर करून शूटिंग क रीत होतो. ३६० डिग्री कॅमेºयांचा वापर भारतात प्रथमच ‘बाहुबली 2’ची शूटिंग करताना आम्ही केला. यासाठी आम्ही काही खास उपकरणे विकत आणली यामुळे बराच खर्च झाला. ‘बाहुबली’च्या सुरुवातीपासूनच आम्हला भारतासाठी चित्रपट तयार करायचा होता. तो एखाद्या विशिष्ठ्य भाषेतील चित्रपट असावा असे वाटत नव्हते. यामुळे आम्ही याला एकाच वेळी चार भाषांत तयार करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाचे यश हे खलनायकावर अवलंबून असते. असे सांगून राजमौली म्हणाले, महाभारतात खलनायक अखेरपर्यंत आहे, म्हणूनच ते यशस्वी आहे. यामुळे यात भल्लाळदेवची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे.  ‘बाहुबली २’मधील ९ मिनिटांचा व्हिडीओ लिक झाल्यानंतर ‘बाहुबली’ या चित्रपटासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाची चर्चा होत होती. ‘बाहुबली’च्या पहिल्या भागातही दर्जेदार तंत्रज्ञान वापरण्यात आल्याने अभूतपूर्व यश मिळाले. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक राजमौली यांनी ‘बाहुबली२’च्या शूटींगदरम्यानचा एक व्हिडिओ चाहत्यांशी शेअर केला होता. ‘बाहुबली २’मध्ये प्रभास,अनुष्का शेट्टी, राणा डग्गुबाती, तम्म्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.