Join us  

VIDEO : Urvashi आणि मिल्खा सिंह यांची एअरपोर्टवर खास भेट, उर्वशीचं भरभरून कौतुक करत आहेत फॅन्स

By अमित इंगोले | Published: November 19, 2020 9:33 AM

उर्वशी रौतेलाच्या या व्हिडीओवर फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. प्रत्येकजण तिच्या उर्वशीच्या स्टाइलची आणि तिच्या खास अंदाजाचं कौतुक करत आहेत.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव राहते. ती नेहमीच तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. तिचा नुकताच शेअर करण्यात आलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती 'द फ्लाइंद सिख' म्हणजे मिल्खा सिंह यांना भेटताना दिसत आहे. खास बाब तर ही आहे की, यात ती मिल्खा सिंह यांना भेटताच त्यांच्या पाया पडताना दिसली. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

उर्वशी रौतेलाच्या या व्हिडीओवर फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. प्रत्येकजण तिच्या उर्वशीच्या स्टाइलची आणि तिच्या खास अंदाजाचं कौतुक करत आहेत. व्हिडीओ शेअर करत उर्वशीने लिहिले की, 'एक महान व्यक्ती मिल्खा सिंह सर यांची भेट घेणं खरंच एक चमत्कारी भावनेचा अनुभव होता'. या व्हिडीओत उर्वशी मिल्खा सिंह यांच्या पाया पडताना दिसत आहे तर सोबतच त्यांच्यासोबत खास फोटोही क्लिक केलाय.

उर्वशी रौतेलाने सनी देओलसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. 'सिंह साहेब द ग्रेट' हा तिचा पहिला सिनेमा होता. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती 'ग्रेट ग्रॅंड मस्ती' सिनेमात दिसली होती. त्यानंतर ती सर्वात जास्त चर्चेत आली 'हेट स्टोरी ४' सिनेमातून. तिच्या सध्याच्या कामाबाबत सांगायचं तर तिचं लॉकडाऊनआधी 'एक डायमंड दा हार लेदे यार' हे गाणं रिलीज झालं होतं. हे गाणं चांगलंच गाजलं होतं. त्याआधी उर्वशी 'पालगपंती' सिनेमातही दिसली होती.   

टॅग्स :उर्वशी रौतेलामिल्खा सिंगबॉलिवूड