उर्वशी रौतेलाने सनी देओलविषयी केला ‘हा’ दावा; मात्र व्हिडीओने केली पोलखोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 20:53 IST
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने सनी देओलविषयी एक दावा केला. मात्र व्हिडीओमध्ये लगेचच तिची पोलखोल झाली आहे.
उर्वशी रौतेलाने सनी देओलविषयी केला ‘हा’ दावा; मात्र व्हिडीओने केली पोलखोल!
हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा बहुप्रतिक्षित ‘हेट स्टोरी-४’ हा चित्रपट ९ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात उर्वशी पुन्हा एकदा बोल्ड अंदाजात बघावयास मिळणार आहे. सध्या उर्वशी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच जेव्हा उर्वशीला ‘अभिनेता सनी देओल आणि पुलकित सम्राट यांच्यापैकी कोण सर्वात चांगला किसर आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा उर्वशीने दिलेले उत्तर सगळ्यांनाच चकित करणारे ठरले. तिने म्हटले की, ‘मी या दोघांपैकी कोणासोबतच आॅनस्क्रीन किसिंग सीन दिला नाही.’ वास्तविक उर्वशीने केलेला हा दावा काही वेळानंतरच फोल ठरला. कारण सनी देओल आणि पुलकितसोबत किसिंग सीन देतानाचा उर्वशीचा एक व्हिडीओ आता समोर आला असून, त्यामध्ये ती या दोघांसोबतही किसिंग सीन देताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे उर्वशीने केलेल्या या दाव्यात कितपत तथ्यता आहे, याबद्दल आता चर्चा रंगत आहे. दरम्यान, २०१३ मध्ये आलेल्या ‘सिंग साहब दि ग्रेट’ या चित्रपटातून उर्वशीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटात ती सनी देओलच्या अपोझिट बघावयास मिळाली होती. सध्या ती ‘हेट स्टोरी-४’मध्ये प्रमुख भूमिकेत बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात उर्वशीने जबरदस्त हॉट सीन दिले आहेत. चित्रपटाच्या कथेनुसार, उर्वशी या चित्रपटात दोन भावांसोबत रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात उर्वशीच दोन भावांमध्ये वाद लावण्यास कारणीभूत ठरणार आहे. ‘हेट स्टोरी’ सिरीजचा हा चौथा चित्रपट आहे. विशाल पंड्या दुसºया आणि तिसºया भागानंतर चौथ्या भागात दिग्दर्शक म्हणून समोर येत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले होते.