Join us

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उर्वशी रौतेलाने सांगितला इंडस्ट्रीत तिला आलेला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 19:58 IST

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने सनी देओलसोबत सिंह साहब दी ग्रेट सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने सनी देओलसोबत सिंह साहब दी ग्रेट सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्याचा बॉलिवूडमध्ये आतापर्यंतचा त्याचा अनुभव खूप चांगला आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी ठरला, असा आरोप लावण्यात आला आहे. 

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार उर्वशी म्हणाली, “मी सुपरस्टार सनी देओलसोबत डेब्यू केला आहे आणि या संपूर्ण चित्रपटाची शूटिंग आम्ही एकच केली होती. बॉबी देओल आणि धर्मेंद्र सरसुद्धा या सिनेमात होते. माझा हा  इंडस्ट्रीचा अनुभव तर खूप चांगला होता. यानंतर, मी माझ्या टीममध्ये राहून जे काही चित्रपट केले आहेत, त्यात मला कधी स्पेशल ट्रिटमेंट मिळावी अशी अपेक्षादेखील नव्हती. चित्रपटांमध्ये काम करताना किंवा प्रमोशन दरम्यान मला आदर दिला गेला."

उर्वशी सध्या तिच्या आगामी ‘व्हर्जिन भानुप्रिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे, जो ओटीटीवर रिलीज होणार आहे. ज्यात गौतम गुलाटी, अर्चना पुरन सिंग आणि राजीव गुप्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतउर्वशी रौतेला