Join us
Daily Top 2Weekly Top 5

उर्फी जावेदचं इंस्टाग्राम अकाऊंट झालं होतं सस्पेंड; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 13:56 IST

उर्फीचं इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झालं. पोस्ट शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली.

उर्फी जावेद तिच्या अतरंगी अंदाजासाठी लोकप्रिय आहे, परंतु कधीकधी तिच्या फॅशनमुळे तिला खूप ट्रोलही केलं जातं. पण यामुळे उर्फीला काहीच फरक पडत नाही. ती तरीही हटके फॅशन सतत करत असते. आता उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फींचा जीव की प्राण असलेलं तिचं इंस्टाग्राम अकाऊंट हे सस्पेंड झालं होत. उर्फीने पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली.

उर्फीने सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. कम्यूनिटी गाइडलाइन्सचं पालन न केल्याने इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे, असे मेटाने म्हटलं होतं. पण, उर्फीचं अकाऊंट सस्पेंड झाल्याच्या काही वेळातच पुन्हा रिकव्हर झालं आहे. अकाऊंट रिकव्हर झाल्याची माहिती उर्फीने फोटो शेअर करत दिली. 

यात मेटाने म्हटलं की, तुमचे अकाऊंट चुकून  सस्पेंड झाले होते. अकाऊंट पुन्हा सक्रिय केले गेले आहे, आणि तुम्ही आता लॉग इन करु शकता. शिवाय  गैरसोयीबद्दल इंस्टाग्रामने दिलगीरी व्यक्त केली आहे. 

उर्फी जावेद ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनौची आहे. 15 ऑक्टोबर 1996 रोजी जन्मलेल्या उर्फीने मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. तिला अभिनयाची खूप आवड होती. त्यामुळे उर्फी अगदी लहान वयात मुंबईत आली. उर्फीने बेपन्ना, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसौटी जिंदगी की सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.  उर्फी जावेदला खरी ओळख बिग बॉस ओटीटीनंतर मिळाली. यानंतर तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलची चर्चा होऊ लागली आणि आज ती स्टाइल दिवा बनली आहे.

टॅग्स :उर्फी जावेदबॉलिवूडसेलिब्रिटीफॅशन