Join us
Daily Top 2Weekly Top 5

या चिमुरडीने लता मंगेशकरांचे गायलेले गाणे ऐकून रानू मंडललाही तुम्ही विसराल, पाहा हा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 13:04 IST

ही चिमुरडी केवळ दोन वर्षांची असून ती हे गाणे अतिशय सुरात गात आहे. तसेच तिचे उच्चार देखील अतिशय स्पष्ट आहेत.

ठळक मुद्देहे गाणे दोन वर्षांची मुलगी अतिशय सुरात गात असून तिचे उच्चार देखील अतिशय स्पष्ट आहेत. या मुलीचं नाव प्रज्ञा मेधा असून सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक दोन-अडीज वर्षांची चिमुरडी चक्क लता मंगेशकर यांचे लग जा गले हे गाणे गाताना दिसत आहे. ती हे गाणे अतिशय सुरात गात असून तिचे उच्चार देखील अतिशय स्पष्ट आहेत. या मुलीचं नाव प्रज्ञा मेधा असून सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

1964 साली आलेल्या वो कौन थी या चित्रपटातील लग जा गले हे गाणे आजही रसिकांचे अतिशय आवडते गाणे आहे. या गाण्याला आज इतकी वर्षं झाली असली तरी या गाण्याची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. हे गाणे अतिशय सुंदररित्या प्रज्ञा गाताना दिसत आहे. 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं गाणं एक प्यार का नगमा हैने एका रात्रीत रानू मंडलचे आयुष्यच बदलून टाकले. रानू मंडल सध्याच्या घडीला सोशल मीडियावरील चर्चेचा विषय बनली आहे. रानूचे नाव देशभरात प्रचलित झाले आहे. कोलकाताच्या स्टेशनवर गाणे गाणारी रानूचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्यामुळे लोकप्रिय झालेली गायिका रानू मंडलचे काही दिवसांपूर्वी 'तेरी मेरी कहानी' हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानेच रानूला बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा गाण्याची संधी दिली.

टॅग्स :लता मंगेशकर