Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री? तिनेच शेअर केला तिचा हा विचित्र लूकमधील फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:10 IST

या अभिनेत्रीने तिच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

ठळक मुद्देस्वराने हे फोटो ट्वीट केल्यानंतर त्यावर आता मीम्स बनवले जात आहेत. तिने आपके कमरे में कोई रहता है या वेबसिरिजच्या प्रमोशनसाठी हे फोटो पोस्ट केले आहेत.

स्वरा भास्कर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती ट्विटरवर अनेक सामाजिक प्रश्नांवर आपले मत व्यक्त करत असते. ती सोशल मीडियावर अनेक वेळा समोरच्यांची बोलती बंद करते तर काही वेळा तिला तिच्या मतांसाठी ट्रोल देखील केले जाते. पण आता स्वराचा एक वेगळाच अंदाज नेटिझन्सना पाहायला मिळाला आहे. 

स्वराने तिच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत आणि यावर तुम्ही मिम्स बनवा असे लोकांना आवाहन केले आहे. स्वराने शेअर केलेल्या एका फोटोत तिची विचित्र हेअरस्टाईल पाहायला मिळतेय तर दुसऱ्या फोटोत केस विस्कटलेले, त्यावर तिरका मांग टिक्का लावलेला, मोठा चष्मा आणि लहेंगा घातलेली स्वरा पाहायला मिळत आहे. 

स्वराने हे फोटो ट्वीट केल्यानंतर त्यावर आता मीम्स बनवले जात आहेत. तिने आपके कमरे में कोई रहता है या वेबसिरिजच्या प्रमोशनसाठी हे फोटो पोस्ट केले आहेत. या वेबसिरिजमध्ये तिच्यासोबत सुमीत व्यास, नवीन कस्तूरिया, अमोल पराश, आशीष वर्मा यांसारखे अनेक कलाकार आहेत. या वेबसिरिजमध्ये पाच भाग आहेत. एमएक्स प्लेअरवर ही वेबसिरिज २२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

स्वरा भास्करने गेल्या काहीच वर्षांत बॉलिवूडमध्ये तिचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात स्वरा आपल्याला साहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. नंतर तिने एक अभिनेत्री म्हणून तिची एक ओळख निर्माण केली. स्वराने तनू वेड्स मनू, तनू वेड्स मनू २, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटे यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकरल्या आहेत. वीरे दे वेडिंग या चित्रपटामुळे तर सध्या तिच्या नावाची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात तिच्यावर चित्रीत करण्यात आलेला एक बोल्ड सीन चांगलाच वादात सापडला होता. पण हे दृश्य देऊन मी काहीच चुकीचे केले नाही असे स्वराचे स्पष्ट मत होते.

टॅग्स :स्वरा भास्कर