Join us  

आई-वडील स्टार असूनही ट्विंकल खन्नावर आली होती मासे विकायची वेळ; अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 6:31 PM

Twinkle khanna: एकेकाळी ट्विंकल चक्क मासे विकायची याचा खुलासा तिने स्वत: केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (twinkle khanna)  हिचा पूर्वीपेक्षा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कायम चर्चेत येत असते. समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर ट्विंकल उघडपणे व्यक्त होते. यात बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र, यावेळी ती तिच्या पहिल्या जॉबमुळे चर्चेत आली आहे. एकेकाळी ट्विंकल चक्क मासे विकायची. याचा खुलासा तिने स्वत: केला आहे.

अलिकडेच ट्विंकलने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. “मला आठवतंय की, माझं पहिलं काम मासे आणि कोळंबी पोहोचवण्याचं होतं. माझ्या आजीच्या बहिणीची म्हणजेच माझ्या मावस आजीची माशांची कंपनी होती. या कंपनीचे नाव ‘मच्छीवाला’ होते. जेव्हा मी लोकांना माझ्या कामाबद्दल सांगायचे तेव्हा ते मला मच्छीवाली आहेस का? असं विचारायचे,” असं ट्विंटकल म्हणाली.

पुढे ती म्हणते, "नंतर मी इंटीरियर डेकोरेटर म्हणूनही काम केले. मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे होते, म्हणून मी एकाच वेळी सीए परीक्षेसाठी अर्ज केला होता. पण याच दरम्यान माझ्याकडे चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मुलींसाठी पैसे कमवण्याची हीच योग्य वेळ आहे", असे आई डिंपल कपाडिया यांनी सांगितलं आणि मी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

दरम्यान,  ट्विंकल खन्ना दिवंगत अभिनेता राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे. ट्विंकलने १९९५ मध्ये ‘बरसात’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ‘जब प्यार किसी से होता है’, ‘मेला’, ‘जोरू का गुलाम’ आणि ‘बादशाह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.  

टॅग्स :ट्विंकल खन्नासेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा