Twinkle Khanna On Menopause : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी, लेखिका आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच, ट्विंकलने महिलांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण पण महत्त्वाच्या टप्प्यापैकी एक असलेल्या रजोनिवृत्तीबद्दल बोलून अनेक महिलांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
ट्विंकल खन्नाने "दर्द-ए-डिस्को आणि नवीन मेनोपॉज रिमिक्स" या लेखात मेनोपॉजचा अनुभव लिहलाय. ट्विंकलने मेनोपॉजची तुलना एका चोराशी केली आहे. जो फक्त तिजोरी उघडत नाही, तर तुमचं मौल्यवान सामान घेऊन पळून जातो. रजोनिवृत्तीच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या ट्विंकल खन्नाने पुढे स्पष्टपणे सांगितले की, तिला अशा पुरुषांचा हेवा वाटतो ज्यांना महिलांप्रमाणे हार्मोनल असंतुलनाचा सामना करावा लागत नाही. या बदलांमुळे तिच्या स्मरणशक्तीवरही परिणाम झाला असून, अनेकदा तिला नावे, चित्रपट किंवा पुस्तके आठवत नाहीत.
आहारात केला बदलया शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जाण्यासाठी ट्विंकलने आता उपाययोजना सुरू केल्या आहेत. तिने जवळजवळ २० वर्षांनंतर वेटलिफ्टिंग पुन्हा सुरू केले आहे. तसेच ती स्क्वॅट्स, लंजेस आणि पेल्विक फ्लोअर व्यायाम करते. याशिवाय मॅग्नेशियम ग्लायसिनेट, अश्वगंधा, लायन्समन, ब्राह्मी आणि प्रिमरोज ऑईल यांसारखी सप्लिमेंट्स घेते. ट्विंकलने आहारावर नियंत्रण ठेवले असून, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात टोस्टेड सँडविच खाणे सुरू केले आहे. ती आता तिची मुलगी नितारासोबत दर दोन आठवड्यांनी एकदाच आईस्क्रीमचा आनंद घेते.
रजोनिवृत्ती म्हणजे काय?रजोनिवृत्ती हा असा काळ आहे जेव्हा महिलांच्या शरीरातील हार्मोन्स (Hormones) बिघडतात आणि त्यांची मासिक पाळी (Menstrual Cycle) थांबते. साधारणपणे ४५ ते ५५ वयोगटातील महिलांना याचा सामना करावा लागतो. मासिक पाळी थांबते हे ऐकायला चांगले वाटत असले तरी, या टप्प्यावर पोहोचणे सोपे नसते. या काळात झोपेचा त्रास (Sleep issues), मूड स्विंग्ज (Mood Swings), शरीरात उष्णता (Hot Flushes) आणि तीव्र थकवा अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Web Summary : Twinkle Khanna openly discusses her menopause experience, highlighting hormonal imbalances and memory issues. She's adopted lifestyle changes including weightlifting, supplements, and dietary adjustments to manage symptoms. She expresses envy towards men for not experiencing these hormonal shifts.
Web Summary : ट्विंकल खन्ना ने रजोनिवृत्ति के अपने अनुभव पर खुलकर बात की, हार्मोनल असंतुलन और याददाश्त संबंधी समस्याओं पर प्रकाश डाला। लक्षणों को प्रबंधित करने के लिए उन्होंने वेटलिफ्टिंग, सप्लीमेंट्स और आहार समायोजन सहित जीवनशैली में बदलाव अपनाए हैं। उन्होंने पुरुषों को इन हार्मोनल बदलावों का अनुभव न होने पर ईर्ष्या व्यक्त की।