Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही शोमध्ये आयुष्यमान खुराणाने जाहीरपणे भूमी पेडणेकरच्या प्रायव्हेट लाइफबद्दल केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 19:59 IST

अभिनेता आयुष्यमान खुराणा याने भूमी पेडणेकरच्या प्रायव्हेट लाइफबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचा व्हिडीओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे.

नुकताच सोशल मीडियावर अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि आयुष्यमान खुराना यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दोघेही बिनधास्तपणे त्यांच्या सेक्स लाइफबद्दल बोलताना बघावयास मिळत आहेत. हा व्हिडीओ अभिनेत्री नेहा धूपियाच्या वोग बीएफएफएस या नव्या टीव्ही शोच्या एका एपिसोडचा प्रोमो आहे. ज्यामध्ये भूमी आणि आयुष्यमान गेस्ट म्हणून पोहोचले होते. यावेळी दोघांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी बिनधास्तपणे चर्चा केली.  प्रोमोमध्ये भूमी आणि आयुष्यमान एकमेकांची चांगलीच फिरकी घेताना दिसतात. जेव्हा नेहा आयुष्यमानला सेक्स लाइफविषयी विचारते. तेव्हा तो भूमीकडे इशारा करताना म्हणतो की, भूमी सेक्सशिवाय एक ताससुद्धा राहू शकत नाही. आयुष्यमान एवढ्यावरच थांबत नाही तर, पुढे म्हणतो की, तिच्या बॉयफ्रेंडला खूप पेशेन्स ठेवावे लागतात, कारण ती बेडवर खूपच स्लो आहे.  आयुष्यमानचे हे शब्द ऐकून भूमीचा चांगलाच पारा चढतो. भूमीनेदेखील त्याची खिल्ली उडविताना त्याला मोस्ट सेक्शुअल मॅन असे म्हटले. भूमीने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात २०१५ मध्ये आयुष्यमान खुराना याच्यासोबत ‘दम लगाके हईशा’ या चित्रपटातून केली. गेल्या वर्षीच दोघांचा ‘शुभमंगल सावधान’ हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.