Join us

लग्नानंतर अजय देवगणचे होते महिमा चौधरीसोबत अफेअर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 15:29 IST

अजय देवगण लग्नानंतर महिमाच्या प्रेमात पडला अशा बातम्या त्यावेळी अनेक प्रसारमाध्यमात आल्या होत्या.

ठळक मुद्देमहिमा आणि अजय देवगण यांनी अनेक वर्षं यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण आता महिमाने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. 

अजय देवगण आणि महिमा चौधरी यांनी दिल क्या करे या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत काजोलदेखील मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान महिमा आणि काजोल यांच्यात अफेअर सुरू झाले असल्याच्या चर्चांना त्याकाळी ऊत आले होते.

अजय देवगण लग्नानंतर महिमाच्या प्रेमात पडला अशा बातम्या त्यावेळी अनेक प्रसारमाध्यमात आल्या होत्या. महिमा आणि अजय देवगण यांनी अनेक वर्षं यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण आता महिमाने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. 

महिमाने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, अजय आणि माझ्या अफेअरच्या चर्चा त्याकाळात चांगल्याच गाजल्या होत्या. पण या केवळ अफवा होत्या. दिल क्या करे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याआधी माझा एक अपघात झाला होता. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर काही खुणा आल्या होत्या. त्यामुळे माझे क्लोजअप शॉर्ट घेऊ नका अशी विनंती मी दिग्दर्शकाला केली होती. पण त्यांनी काही केल्या माझे ऐकले नाही. यामुळे मी नाराज झाले होते. दिग्दर्शकावर प्रचंड चिडले होते. 

महिमाने पुढे सांगितले की, मी अस्वस्थ असल्याचे अजयच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याने मला त्याचे कारण विचारले होते. मी त्याला माझी अडचण सांगितली असता त्याने देखील दिग्दर्शकाला विनंती केली होती की, माझे क्लोज अप शॉर्ट घेऊ नका... या घटनेनंतर दिग्दर्शकाने सगळ्यांना सांगितले होते की, अजय महिमावर प्रेम करतो. त्यानंतर ही गोष्ट सगळीकडे हवेसारखी पसरली होती. 

 

टॅग्स :अजय देवगणमहिमा चौधरीकाजोल