Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ट्रोल झाली न्यासा ; युजर्स म्हणाले,‘तू प्लास्टिक सर्जरी केली का?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 19:00 IST

ती पापा अजयसोबत एका मंदिरात क्रॉप टॉप घालून दर्शनासाठी गेलेली दिसली. तेव्हा पापाराझींनी काढलेल्या फोटोंमुळे ती चर्चेत आली. तिला ट्रोलर्सनी ट्रोल करायला सुरूवात केली.

बॉलिवूडची सेनोरिटा काजोल आणि सिंघम अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगण ही सध्या सोशल मीडियाच्या निशाण्यावर असलेली दिसतेय. काल-परवा ती पापा अजयसोबत एका मंदिरात क्रॉप टॉप घालून दर्शनासाठी गेलेली दिसली. तेव्हा पापाराझींनी काढलेल्या फोटोंमुळे ती चर्चेत आली. तिला ट्रोलर्सनीट्रोल करायला सुरूवात केली. बरं, युजर्स तेवढ्यावरच थांबले नाहीत तर नुकतीच ती आई काजोलसोबत जाताना पापाराझींना दिसली. तेव्हा तिच्यातील बदलांवर प्रश्न उपस्थित करून तिला पुन्हा ट्रोल करायला त्यांनी सुरूवात केली.

त्याचं झालं असं की, प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या वडिलांचं अलीकडेच निधन झाले. त्यांच्या सांत्वनासाठी काजोल न्यासासोबत मनीषक डे गेली. बस्स.. झालं, त्या दोघींचे फोटो व्हायरल झाले आणि तिला पुन्हा ट्रोल करायला सर्वांनी सुरूवात केली. एका युजरने लिहिले,‘नीसाची ट्रीटमेंट सुरू झाली आहे,’ दुसरा युजर म्हणतो,‘कॉस्मेटिक ट्रीटमेंट कुणीही करेल, फक्त पैसा पाहिजे,’ तिसऱ्याने लिहिले,‘न्यासाचा रंग सावळा होता, एकदम ती गोरी कशी काय दिसू लागली’, एकाने लिहिले की, ‘न्यासाने सर्जरी आणि व्हाईटनिंग ट्रीटमेंट सर्जरी करून घेतली आहे.’

या फोटोत न्यासाने थोडे चांगले कपडे घातल्याचे समजतेय.  ती मंदिरात गेली असता तिचे कपडे पाहून ट्रोलर्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली होती. त्यावेळी तिच्यासोबत अजय देवगण असल्याने त्याने पत्रकारांनाच सुनावले. ‘स्टारकिड्सला ग्लॅमरची सवय नाही.  त्यांना त्यांचं आयुष्य मुक्तपणे जगू द्या. त्यांचे असे फोटो काढत जाऊ नकात!’            

टॅग्स :काजोलअजय देवगणट्रोल