Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘खुबसुरत जोडी’ चा कुल सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 10:14 IST

 पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि मस्सकली गर्ल सोनम कपूर यांनी ‘खुबसुरत’ चित्रपटात उत्तम जोडी साकारली. या दोघांनी चित्रपटात उत्तम ...

 पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि मस्सकली गर्ल सोनम कपूर यांनी ‘खुबसुरत’ चित्रपटात उत्तम जोडी साकारली. या दोघांनी चित्रपटात उत्तम केमिस्ट्री चाहत्यांसमोर ठेवली.‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ मध्ये फवादचा अभिनय आणि ‘नीरजा’ मध्येही सोनम कपूरचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. ते दोघे नुकतेच ‘ग्रेझिआ यंग फॅशन अ‍ॅवॉर्डस २०१६’ मध्ये एकत्र आले होते. त्यावेळी त्यांनी सेल्फी काढले. हे सेल्फी खरंच दोन चांगल्या, जाणकार कलाकारांचे सेल्फी वाटतात.ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्रही आहेत. फॅशनिस्टा सोनम कपूर डेल्पोझो आणि अ‍ॅक्वाझुरा क्रिएशन्सच्या कॉस्च्युम्समध्ये फारच हॉट दिसत होती. तर फवाद सुटमध्ये अतिशय कुल दिसत होता.