Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅकलिन फर्नांडिसने शेअर केला टॉपलेस फोटो, तिची पोस्ट बघून फॅन्सची उडाली झोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 17:33 IST

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकताच तिने सेमी न्यूड फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट बॅकग्राउंडमध्ये शेअर केलेला हा फोटो पाहून फॅन्स तिचे भरभरून कौतुक करत आहेत. या फोटोमध्ये जॅकलिन फारच ग्लॅमरस दिसते आहे. तिने हा फोटो शेअर करत वावा अशी कॅप्शन दिली आहे. 

जॅकलिन फर्नांडिसने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत ती टॉपलेस सोफ्यावर पडून पोझ देताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. कुणी स्टनिंग म्हणतंय तर कुणी हॉट. तिच्या या फोटोला तासाभरात ११ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. तिच्या या फोटोवर फक्त तिचे चाहतेच नाही तर बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटींनीदेखील कमेंट केली आहे. जॅकलिनने यापूर्वी देखील बऱ्याचदा असे टॉपलेस आणि बोल्ड फोटो शेअर करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

जॅकलिन फर्नांडिस अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे'मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. जॅकलिनकडे सध्या एकूण ४ बिग बजेट चित्रपट आहेत. यापैकी 'बच्चन पांडे' हा एक चित्रपट आहे. रोहित शेट्‌टीच्या 'सर्कस'मध्ये ती रणवीर सिंगसोबत झळकणार आहे.

तसेच सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूरसोबत 'भूत पुलिस', तर सलमान खानसोबत 'किक-२'मध्येही स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ती अक्षय कुमारसोबत रामसेतू चित्रपटातही काम करताना दिसणार आहे.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसअक्षय कुमार