Join us

2021 मध्ये 'ही' अभिनेत्री ठरली टॉप ट्रेंडिंग; इंटरनेटवर सर्वाधिक वेळा झाली Search

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 11:45 IST

Bollywood: २०२१ या वर्षात कलाविश्वात अनेक घडामोडी घडून गेल्या. अनेक सेलिब्रिटी या वर्षात लग्न बंधनात अडकले. तर, काही सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात सापडले.

बॉलिवूड (bollywood) सेलिब्रिटी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या प्रोफेशनल लाइफमुळे तर कधी त्यांच्या पर्सनल लाइफमुळे. त्यातच २०२१ या वर्षात कलाविश्वात अनेक घडामोडी घडून गेल्या. अनेक सेलिब्रिटी या वर्षात लग्न बंधनात अडकले. तर, काही सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यामुळे हे वर्ष बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी फार महत्त्वाचं ठरलं. विशेष म्हणजे या सेलिब्रिटींच्या गराड्यात एक अभिनेत्री संपूर्ण वर्षभर टॉप ट्रेंडिंगमध्ये ठरली. म्हणजेच सोशल मीडियावर तिचं नाव सर्वाधिक वेळा सर्च केलं गेलं. त्यामुळेच २०२१ या वर्षात सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलेली अभिनेत्री कोण ते पाहुयात.

दरवर्षी प्रमाणे याहुने (YAHOO)  २०२१ मध्ये सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या महिला सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बॉलिवूडची टॉप अॅक्ट्रेस अग्रस्थानावर असल्याचं समोर आलं आहे. 

याहुने (YAHOO)  केलेल्या सर्व्हेक्षणानुसार, अभिनेत्री करीना कपूर-खान (kareena kapoor-khan) २०२१ मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिली आहे. या रिपोर्टनुसार, करीनाचं नाव वर्षभरात सर्वात जास्त वेळा सर्च करण्यात आलं. तसंच करीनासोबत अभिनेत्री कतरिना कैफदेखील सर्वाधिक चर्चेत राहिली आहे.

दरम्यान, करीना कपूरचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी अनेक अपडेट सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यामुळे या चित्रपटामुळे करीनाचं नाव सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलं. तिच्याच पाठोपाठ कतरिना कैफ सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या महिला सेलिब्रिटींमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर जागतिक स्तरावर आपलं स्थान निर्माण करणारी प्रियांका चोप्रा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

टॅग्स :करिना कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा