‘काबील’चा टिझर आऊट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 12:16 IST
कथेला ‘द मार्इंड सीज आॅल.’ ही टॅगलाईन देण्यात आली आहे. संवेदनशील कथानक, हृतिक-यामीचा अभिनय, राकेश रोशन हे निर्माते असे संपूर्ण पॅकेज असलेला हा चित्रपट कितपत चाहत्यांना रूचतो ते लवकरच कळेल.
‘काबील’चा टिझर आऊट!
बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनचा ‘मोहेंजोदडो’ चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगलाच आपटला. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या चित्रपटाकडून असलेल्या सर्व अपेक्षा धुळीस मिळाल्या. त्यामुळे आता त्याला आगामी ‘काबील’ चित्रपटाकडून खुप अपेक्षा आहेत. नुकताच या चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे. यात हृतिक एका अंध व्यक्तीची भूमिका साकारताना दिसतोय.टिझरमध्ये दृश्यांचा अभाव असून केवळ बॅकग्राऊंडच्या डायलॉगसह हा टिझर पूर्ण करण्यात आला आहे. ‘आप की आँखे तो खुली रहेंगी, लेकिन आप कुछ देख नही पायेंगे. आप के कान खुले रहेंगे, पर आप कुछ सुन नही पायेंगे. आप का मुह खुला रहेगा, लेकिन आप कुछ बोल नही पायेंगे. और सबसे बडी बात- आप को समझ सब आ रहा हैं लेकिन आप किसीको समझा नही पायेंगे.’ कथेला ‘द मार्इंड सीज आॅल.’ ही टॅगलाईन देण्यात आली आहे. संवेदनशील कथानक, हृतिक-यामीचा अभिनय, राकेश रोशन हे निर्माते असे संपूर्ण पॅकेज असलेला हा चित्रपट कितपत चाहत्यांना रूचतो ते लवकरच कळेल. ">http://