Join us

तैमूरने असा कापला त्याच्या पहिल्या वाढदिवसाचा केक; मावशी करिष्मा कपूरने शेअर केले फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 21:13 IST

पतौडी खानदानचा वारस तैमूर अली खान आज एक वर्षाचा झाला असून, त्याचा पहिलाच वाढदिवस अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला ...

पतौडी खानदानचा वारस तैमूर अली खान आज एक वर्षाचा झाला असून, त्याचा पहिलाच वाढदिवस अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. बुधवारी तैमूरने त्याच्या पहिल्या वाढदिवसाचा केक कापताना खूप धमाल केली. यावेळी त्याच्यासोबत मम्मी करिना कपूर-खान आणि पापा सैफ अली खान उपस्थित होते.  तैमूरने त्याचा बर्थ डे केक कापल्यानंतर त्याच्यासोबतच तो खेळताना दिसून आला. याबाबतचे काही फोटो त्याची मावशी करिष्मा कपूरने सोशल मीडियावर शेअर केले असून, नेटिझन्सकडून त्यास प्रचंड पसंत केले जात आहे. दरम्यान, तैमूरचा पहिलाच वाढदिवस असल्याने संपूर्ण पतौडी पॅलेस लाइटिंगने झगमगाटून निघाले होते. यावेळी बॉन फायरचीही व्यवस्था करण्यात आली होती. परंतु करिनाचे आजोबा शशी कपूर यांचे गेल्या काही दिवसांपूर्वीच निधन झाल्याने म्हणावा तसा झगमगाट केला गेला नाही. त्याचबरोबर बर्थ डे पार्टीत मोजक्याच लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त मोजकेच पाहुणे या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. तैमूरच्या वाढदिवसासाठी शाहरूख खानचा मुलगा अबराम आणि करण जोहरचे ट्विन्स यश आणि रूही पार्टीत हजर झाल्याचे समजते. त्याचबरोबर अभिनेता तुषार कपूरचा मुलगा लक्ष हादेखील तैमूरच्या बर्थ डेला उपस्थित होता, असे म्हटले जात आहे. दरम्यान, तैमूरचा जन्म २० डिसेंबर २०१६ रोजी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात झाला होता. जन्मल्यापासूनच तैमूर माध्यमांमध्ये चर्चिला जात आहे. त्याच प्रत्येक फोटो सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत असतो. बर्थ डेचे फोटोदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.