Join us  

टायगर श्रॉफचा फिटनेस फंडा, सोशल मीडियावरील त्याचे हे फोटो तुम्हालाही प्रेरणा देईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 8:40 PM

खुद्द आमिर खाननेही 'धूम-3' च्या शूटिंगदरम्यान पिळदार बॉडी बनवण्यासाठी टायगरकडूनच टीप्स घेतल्या होत्या.

बॉलीवुडचा अॅक्शन हिरो म्हणून अभिनेता टायगर श्रॉफने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 'हिरोपंती' या सिनेमातून टायगर श्रॉफ रुपेरी पडद्यावर पदार्पण  केले होते. टायगर सोशल मीडियावरही बराच अॅक्टिव्ह असतो. स्वतःचे डान्स आणि फिटनेस व्हिडीओ तो सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करतो. मुळात फिटनेस फ्रिक असलेला टायगर श्रॉफचा फोटो समोर आला आहे. पिळदार बॉडी पाहून त्याच्या या फोटोला त्याच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा हा फोटो तुम्हालाही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल. त्याची  पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. 

टायगरला कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही. तो  ना दारू पितो ना सिगारेट. टायगरला लहानपणापासूनच स्पोर्ट्स आणि डान्सिंगची आवड आहे. विशेष म्हणजे टायगरने आपले फिटनेस स्कील हे स्वतःपर्यंतच ठेवले नाही तर तो इतर अभिनेत्यांनाही फिटनेस टीप्स देतो. खुद्द आमिर खाननेही 'धूम-3' च्या शूटिंगदरम्यान पिळदार बॉडी बनवण्यासाठी टायगरकडूनच टीप्स घेतल्या होत्या.टायगर केवळ फायटिंगच चांगली करतो असं नाही तर तो एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. डान्समध्ये ह्रतिक रोशनला कुणी टक्कर देत असेन तर तो फक्त टायगरच देऊ शकतो. फॅन्स टायगरच्या डान्सिंगवर फिदा असतात. डान्स करताना टायगरमधली ऊर्जा पाहून सारेच थक्क होतात.

टॅग्स :टायगर श्रॉफ