Join us

​टायगर श्रॉफ हेट्स प्रमोशन्स...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 20:00 IST

टायगर श्रॉफ हेट्स प्रमोशन...होय, ऐकता ते खरे आहे. खुद्द टायगरनेच अगदी प्रामाणिकपणे याची कबुली दिली. टायगर सध्या ‘अ फ्लार्इंग ...

टायगर श्रॉफ हेट्स प्रमोशन...होय, ऐकता ते खरे आहे. खुद्द टायगरनेच अगदी प्रामाणिकपणे याची कबुली दिली. टायगर सध्या ‘अ फ्लार्इंग जट’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण खरे विचाराल तर चित्रपटाचे प्रमोशन हा भाग टायगरला जराही आवडत नाही. मला प्रमोशन अजिबात आवडत नाही. कारण हा संपूर्ण प्रकार प्रचंड थकवणारा असतो. कुठल्याही टीव्ही शोमध्ये जा, तेच ते रटाळ प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येकवेळी तेच ते उत्तर द्यावे लागते. खरे तर चित्रपटाचे शूटींग संपल्यावर घरी जावे आणि मस्तपैकी ताणून द्यावी, असेच मला वाटते, असे अलीकडे टायगरने एका मुलाखतीत सांगितले. अर्थात असे असले तरी प्रमोशन आता गरज झाली आहे,याचे भान टायगरला आहेच. कारण  कितीही मनाविरूद्ध असले तरी टायगर प्रमोशन करताना दिसतोय आणि उत्साहात करतोय...आहे ना गंमत!!