टायगर श्रॉफ हा अभिनयासोबतच त्याच्या फिटनेस आणि डान्सिंग स्टाइलमुळेही चर्चेत असतो. हृतिक रोशननंतर टायगर श्रॉफच्या डान्सचे चाहते दिवाने आहेत. पण, सध्या मात्र टायगर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. टायगरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो क्रिकेट खेळताना दिसत आहे. पण, त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी मात्र त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.
टायगरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो त्याच्या मित्रांसह क्रिकेट खेळत आहे. गणेश आचार्य बॉलिंग करत आहेत. तर टायगर बॅटिंग करताना दिसत आहे. पण, व्हिडिओत टायगरला फक्त अंडरवेअर घालून क्रिकेट खेळताना पाहून चाहते भडकले आहेत. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत काहींनी त्याच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.
"कपडे घालूनही खेळू शकला असता", अशी कमेंट एकाने केली आहे. तर काहींनी टायगरला मोगलीही म्हटलं आहे. "चड्डी पहन के क्रिकेट खेला है, क्रिकेट खेला है", "मोगली" अशा कमेंट केल्या आहेत. "फक्त अंडरवेअर घालून क्रिकेट खेळणं गरजेचं आहे का?", अशी कमेंटही केली आहे. "चड्डी क्रिकेट टुर्नामेंट" असंही काहींनी म्हटलं आहे. दरम्यान, टायगर श्रॉफने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. बाघी हा त्याचा सर्वात गाजलेला सिनेमा. अलिकडेच त्याचे 'सिंघम अगेन', 'बडे मियां छोटे मियां' हे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत.