Join us

टायगर श्रॉफ एक्स स्टुंडट आलिया भटसोबत 'स्टुडंट ऑफ द ईयर २'मध्ये लगावणार ठुमके

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 16:59 IST

करण जोहर निर्मित व पुनित मल्होत्रा दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे.

करण जोहर निर्मित व पुनित मल्होत्रा दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तेव्हापासून या सिनेमाच्या चर्चेला उधाण आले आहे. 'स्टुडंट्स ऑफ द ईयर' चित्रपटातून बॉलिवूडमधील करियरला सुरूवात करणारी अभिनेत्री आलिया भट या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती टायगर श्रॉफसोबत ठुमके लगावताना दिसणार आहे.

नुकताच आलियाचा या सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे आणि हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आलिया भट सोबत पहिल्यांदाच टायगर श्रॉफ रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिच्यासोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल टायगरने सांगितले की, 'खूप छान अनुभव होता. जेव्हा करण सरांनी आलिया भटसोबत गाणे करायचे असल्याचे मला सांगितले. त्यावेळी मी खूपच उत्सुक झालो. कारण मी तिचा चाहता आहे. परंतु तिच्यासोबत काम करणे खूप चॅलेंजिंग होते. कारण तिचा प्रत्येक शॉट परफेक्ट होता. त्यामुळे मलादेखील शंभर टक्के द्यावे लागला. तिच्यासोबतचे काम खूप छान झाले आहे.'

या चित्रपटाबाबत टायगर खूप उत्सुक असून तो म्हणाला की, ''स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यातील कलाकारांचेदेखील खूप कौतूक झाले होते.

त्यामुळे आता या चित्रपटाच्या सीक्वेलला रसिक कसा रिस्पॉन्स देतात, हे पाहावे लागेल. त्यामुळे स्टुडंट ऑफ द ईयर २ बाबत मी खूप उत्सुक आणि नर्व्हसदेखील आहे. 'स्टुडंट ऑफ द ईयर २' हे एक वेगळे जग आहे. पहिल्या भागात पाहिलेले कॉलेज तुम्हाला पहायला मिळणार आहे. कथानक, पात्र व स्पोर्ट्स वेगळे पहायला मिळणार आहे.'

टॅग्स :स्टुडंट ऑफ द इअर 2आलिया भटटायगर श्रॉफतारा सुतारियाअनन्या पांडे