Join us
Daily Top 2Weekly Top 5

​टायगर दबावात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2016 15:01 IST

बॉलिवूडमधला कलाकार नवा असो वा जुना, चित्रपट फ्लॉप होण्याची भीती तर वाटतेचं. टायगर श्रॉफ याचेच घ्या. त्याला सध्या हीच ...

बॉलिवूडमधला कलाकार नवा असो वा जुना, चित्रपट फ्लॉप होण्याची भीती तर वाटतेचं. टायगर श्रॉफ याचेच घ्या. त्याला सध्या हीच भीती भेडसावते आहे. बॉलिवूडमध्ये आल्या आल्या टायगरने सलग दोन हिट चित्रपट दिलेत. पण यानंतर एकापाठोपाठ एक असे त्याचे तीनही चित्रपट दणादण आपटले. अलीकडे आलेला ‘फ्लार्इंट जट्ट’कडून टायगरला बरीच अपेक्षा होती. पण त्यानेही टायगरची निराशा केली. त्यामुळे टायगर मनातून थोडा खट्टू झाला असल्याचे कळते. लवकरच टायगर ‘स्टुडंड आॅफ दी ईयर2’मध्ये दिसणार आहे. त्यामुळे टायगर दबावात आहे. कारण ‘स्टुडंड आॅफ दी ईयर’ सुपरहिट ठरला होता. आता त्याच्या सिक्चलकडून तशाच अपेक्षा आहेत. अशास्थितीत  टायगरला टेन्शन हे येणारच ना!