Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’मध्ये आलिया, वाणी नव्हे तर ही असेल नायिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 20:18 IST

यशराज फिल्मस्चा आगामी चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’मध्ये अभिनेत्री कोण असेल यावर बरीच चर्चा होत होती. आलिया भट्ट आणि वाणी ...

यशराज फिल्मस्चा आगामी चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’मध्ये अभिनेत्री कोण असेल यावर बरीच चर्चा होत होती. आलिया भट्ट आणि वाणी कपूर यांची नावे चर्चेत असताना या दोघींवर मात करून टीव्ही अभिनेत्री मृणाल ठाकूरने ही बाजी मारली आहे. टीव्ही मालिका ‘कुमकुम भाग्य’मधून मृणाले आपली ओळख मिळविली आहे. यशराज फिल्मस्च्या वतीने आदित्य चोपडा यांनी ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’ या चित्रपटाची घोषणा करताना यात बॉलिवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमीर खान यांच्या प्रमुख भूमिका असेल असे सांगितले होते. मात्र यात अभिनेत्री कोण असणार याचा खुलासा करण्यात आला नव्हता. दोन मोठ्या नायकांसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्री उत्सुक होत्या. यात सर्वांत आघाडीवर आलिया भट्ट व वाणी कपूर याच्या नावाची चर्चा होती. फिल्मफेअर या संकेत स्थळावरील बातमीनुसार, चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींचे स्क्रिन टेस्ट घेण्यात आले. यात आलिया व वाणीचा देखील समावेश होता. आमिरला या चित्रपटात आलिया भट्ट तर आदित्यला वाणी कपूर यांनी लीड फिमेलचा रोल करावा असे वाटत होते. दोघांनी आपला विचार बदलला असून यात कुमकुम भाग्य या मालिकेतील अभिनेत्री मृणाल ठाकूरची निवड करण्यात आली आहे. आलियाचा 2017 चा शेड्युल पॅक असल्याने ती या चित्रपटाला वेळ देऊ शकणार नव्हती. दुसरीकडे वाणीने दिलेल्या स्क्रिनटेस्टमध्ये तिचा अभिनय आमीरच्या पसंतीस उतरला नाही. यामुळे दोघांनी अन्य अभिनेत्रीच्या निवडीवर विचार केला. मृणाल ठाकूरने ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’साठी दिलेली स्क्रिनटेस्ट आमीर खान व आदित्य चोपडा यांना आवडली. यामुळे तिची निवड करण्यात आली आहे. मृणाल ठाकूर टीव्ही मालिका ‘कुमकुम भाग्य’मध्ये बुलबुलची भूमिका साकारत आहे.