Join us

'माझ्यावर हसणारे आता रडताहेत', कंगना राणौतने सिनेइंडस्ट्रीतील लोकांवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 20:47 IST

अभिनेत्री कंगना राणौत नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. यावेळेस पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौत नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. यावेळेस पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. आता तिने माझ्यावर हसणारे आता रडत आहेत, असे ट्विटरवर म्हणत सिनेइंडस्ट्रीतील लोकांवर निशाणा साधला आहे. 

कंगना राणौतने ट्विटमध्ये लिहिले की, जेव्हा मी सिनेइंडस्ट्रीत आले तेव्हा प्रत्येकजण माझ्यावर हसत होता. माझ्या बोलण्याची पद्धत, माझे केस, माझे कपडे आणि माझ्या इंग्रजीवर हे सर्व लोक हसायचे. मात्र आता ते सर्व लोक रडत आहे आणि मी हसत आहे हा हा हा…

कंगनाचे ट्विटरवर ३ मिलियन (३० लाख) फॉलोअर्स झाले आहेत.त्यामुळे कंगनाने ट्विट करत आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने ट्विट केले की, तुम्हा सर्वांना धन्यवाद. मी मागील महिन्यात ऑगस्टमध्ये ट्विटर जॉईन केले होते. तेव्हा माझी टीम काही हजार फॉलोअर्ससोबत हे सोशल मीडिया हाताळत होते. मी कधी विचार केला नाही की, आम्ही इतक्या लवकर ३ मिलियनचा आकडा पार करणार. ट्विटर अनेकवेळा मन विचलित करतो. मात्र, हा खूपच मजेशीर आहे. धन्यवाद.

कंगना रणौत आणि दिलजीत यांच्यातील ट्विटर वॉरने पुन्हा जोर धरला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने दिलजीत दोसांजवर शेतकरी आंदोलनाच्या मधेच परदेशात सुट्टी एन्जॉय करण्याचा आरोप लावला आहे. दिलजीतने नुकतेच सुट्टी एन्जॉय करतानाचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले होते. त्यावरून कंगनाने त्याच्यावर निशाणा साधला होता. आता दिलजीतने कंगनाला यावरून सणसणीत उत्तर दिलं आहे. दिलजीतने म्हणाला की, तुला तुझ्याबद्दल खूप गैरसमज आहे आणि तू काय केले आहे ते आम्ही पंजाबी लोक विसरलो नाहीत लवकरच आम्ही तुला उत्तर देणार आहोत.

टॅग्स :कंगना राणौतदिलजीत दोसांझ