सुभाष घाईच्या नुसार २००३ मध्ये या चित्रपटाचे काम सुरु होणार होते. ज्यासाठी दिलीप कुमार, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानला कास्ट करण्यात आले होते. चित्रपटाची कथा पण तयार होती आम्ही यातील तीन गाणी रेकॉर्ड सुद्धा केली होती. पण अगदी अखेरच्या वेळीस शाहरुख खानने चित्रपट सोडला.
सुभाष घाईंनी सांगितले की, शाहरुखला त्यावेळेस स्वतंत्र चित्रपट करण्याची इच्छा होती म्हणून त्याने ह्या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शाहरुखचे असे म्हणणे होते की ह्या चित्रपटात कलाकार जास्त आहेत आणि मला स्वतंत्र चित्रपट करायची इच्छा आहे म्हणूनच कदाचित शाहरुखने मदरलँड चित्रपट करण्यास नकार दिला.
चित्रपटाच्या अभिनेत्री बद्दल बोलायचे झाले तर ऐश्वर्या राय बच्चन, प्रीती झिंटा आणि महिमा चौधरीची निवड सुभाष घाईंनी या चित्रपटासाठी केली होती.
सुभाष घाईंनी आपल्या मुलाखतीत पुढे म्हणाले, त्यांनी शाहरुख बरोबर अजून एक चित्रपट करायच्या तयारी केली होती. त्यात शाहरुख खानबरोबर जॅकी श्रॉफ पण काम करणार होता. चित्रपटाचे नाव शिखर होते. मात्र काही कारणास्ताव या चित्रपट होऊ शकला नाही.
शाहरुख खान सध्या आनंद एल राय यांच्या चित्रपटात दिसणार आहे. यात त्याच्यासबोत अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.