Join us  

आतापर्यंत अविवाहित आहेत ‘हे’ स्टार्स, एकजण तर ५६ वर्षाचा आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 2:36 PM

बॉलिवूड एक मोठे कुटुंब आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण याठिकाणी आल्यानंतर कोणताही अ‍ॅक्टर किंवा अ‍ॅक्ट्रेस स्वत:ला एकटे समजत नाही. याठिकाणी त्यांचे वेगळेच विश्व निर्माण होते, मात्र या ग्लॅमर्सच्या जगात आजदेखील काही बॉलिवूड स्टार्स सिंगल लाइफ जगत आहेत. आज आपण अशाच काही स्टार्सच्या बाबतीत जाणून घेऊया त्यांनी आतापर्यंत लग्न केले नाही.

-रवींद्र मोरेबॉलिवूड एक मोठे कुटुंब आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण याठिकाणी आल्यानंतर कोणताही अ‍ॅक्टर किंवा अ‍ॅक्ट्रेस स्वत:ला एकटे समजत नाही. याठिकाणी त्यांचे वेगळेच विश्व निर्माण होते, मात्र या ग्लॅमर्सच्या जगात आजदेखील काही बॉलिवूड स्टार्स सिंगल लाइफ जगत आहेत. आज आपण अशाच काही स्टार्सच्या बाबतीत जाणून घेऊया त्यांनी आतापर्यंत लग्न केले नाही.* करण जौहर४६ वर्षीय दिग्गज चित्रपट निर्माता करण जौहर आजही सिंगल लाइफ जगत आहे. एक काळ असा होता जेव्हा त्याला अभिनेत्री ट्विंकल खन्ना पसंत होती आणि त्याने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोजही केला होता, मात्र ट्विंकलने या प्रपोजला स्पष्ट नकार दिला होता. आपणास माहित असेलच की, करण आज टॉप चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे आणि तो बॉलिवूडमध्ये डायरेक्टर्सच्या शर्यतीत सर्वात टॉपदेखील आहे.* साजिद खान४८ वर्षीय चित्रपट निर्माता साजिद खानदेखील आतापर्यंत अविवाहितच फिरत आहे. साजिदचे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत अफेअरच्या चर्चा ऐकण्यात आल्या होत्या, मात्र हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. साजिदने ‘हाउसफुल’ चित्रपटांच्या तिन्ही सीरिज डायरेक्ट केल्या आहेत. त्याने ‘हिम्मतवाला’ही डायरेक्ट केला आहे. मात्र हा चित्रपट मोठा फ्लॉप ठरला होता.* उदय चोप्रायश चोप्रा यांचा लहान मुलगा उदय चोप्रानेही आतापर्यंत कोणत्याच मुलीला आपली जीवनसाथी बनविले नाही. अर्थात उदय आजही सिंगलच आहे. उदय ४६ वर्षाचा असून तो आपणास मोहब्बतें, धुम सीरिज, प्यार इम्पोसिबल, मुझसे दोस्ती करोगे आदी चित्रपटात दिसला आहे.* रणदीप हुड्डासरबजीत चित्रपटात प्रशंसनीय अभिनय करणारा ४२ वर्षीय अभिनेता रणदीप हुड्डाच्या आयुष्यातही आतापर्यंत कोणतीच मुलगी आलेली नाही. तो आजही सिंगलच आहे. रणदीप आपणास सरबजीत व्यतिरिक्त सुलतान, हायवे, रंग रसिया, जिस्म 2, किक, बागी 2, दो लब्जो की कहानी, लाल रंग, मर्डर 3 आदी चित्रपटात दिसला होता.* संजय लीला भंसालीरामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारा दिग्दर्शक संजय लीला भंसालीने देखील लग्न केले नाही. संजय ५६ वर्षाचा असून तो डायरेक्टरांच्या टॉप लिस्टमध्ये समावेश आहे.* सलमान खानबॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानच्या लग्नाची प्रतीक्षा तर देशातील प्रत्येक तरुणाला आहे. सलमान ५३ वर्षाचा झाला, मात्र अजुनही त्याच्या लग्नाबाबत काहीही खुलासा नाही. सलमान आजही बॉलिवूडमध्ये टॉपचा सुपरस्टार आहे. त्याच्या चाहत्यांना त्याचा अपकमिंग चित्रपट ‘भारत’ ची मोठी प्रतीक्षा आहे जो यावर्षी ईदनिमित्त रिलीज होणार आहे.* अक्षय खन्नाअक्षय खन्नाचा नुकताच २८ मार्च रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. तो ४६ वर्षाचा झाला असून मीडिया रिपोर्टनुसार आतापर्यंत अक्षयचे तीन अफेयर होते. मात्र तरीही तो आज सिंगल आहे. अक्षय सध्या चित्रपटांमध्ये निगेटिव आणि सपोर्टिंग रोल मध्येच दिसत आहे.

टॅग्स :बॉलिवूडसलमान खानसाजिद खानसंजय लीला भन्साळीकरण जोहर